मुंबई, 1 जानेवारी : न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (New Zealand vs Bangladesh) या टेस्ट मॅचनं नव्या वर्षाची सुरूवात झाली. या टेस्टच्या पहिल्याच दिवशी यजमान न्यूझीलंडनं दमदार सुरूवात केली आहे. न्यूझीलंडचा ओपनिंग बॅटर डेवॉन कॉनवे (Devon Conway) याने 2022 मध्ये पहिले शतक झळकावले आहे. कॉनवेचं टेस्ट कारकिर्दीमधील हे दुसरे शतक आहे. यापूर्वी त्यानं लॉर्ड्स टेस्टमध्ये द्विशतक झळकावण्याचा विक्रम केला होता. टॉस गमावल्यानंतर बॅटींगला आलेल्या न्यूझीलंडची सुरूवात खराब झाली. कॅप्टन टॉम लॅथम (Tom Latham) 1 रन काढून आऊट झाला. केन विल्यमसनच्या (Kane Williamson) अनुपस्थितीमध्ये लॅथम या सीरिजमध्ये न्यूझीलंडचा कॅप्टन आहे. तो आऊट झाल्यानंतर कॉनवेनं विल यंगसोबत इनिंग सावरलीा. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 138 रनची भागिदारी केली. यंग अर्धशतकानंतर लगेच (52) रन काढून आऊट झाला. कॉनवेनं 186 बॉलमध्ये 14 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं शतक पूर्ण केले. कॉनवेनं त्याच्या टेस्ट कारकिर्दीमधील 7 व्या इनिंगमध्ये दुसरं शतक झळकावले. त्यानं 3 अर्धशतक देखील झळकावले आहेत. कॉनवेच्या शतकामुळे न्यूझीलंडची पहिल्या टेस्टमधील स्थिती भक्कम झाली आहे.
The first Test ton of 2022 belongs to NZ's Devon Conway 🙌
— cricket.com.au (@cricketcomau) January 1, 2022
Ross Taylor fell for 31 immediately after, NZ are 3-189
LIVE: https://t.co/3PcnYLIa0O #NZvBAN pic.twitter.com/9aVGhl8dn4
पदार्पणात केला होता विक्रम कॉनवेनं यापूर्वी लॉर्ड्स टेस्टमध्ये पदार्पणातच शतक झळकावण्याचा विक्रम केला होता. इंग्लंडमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच द्विशतक ठोकणारा कॉनवे पहिला क्रिकेटपटू आहे. इंग्लंडमध्ये जून महिन्यात झालेल्या टेस्टमध्ये त्याने ही कामगिरी केली होती. पदार्पणाच्या टेस्टमध्येच द्विशतक करणारा कॉनवे हा सहावा क्रिकेटपटू आहे. 2022 मध्ये होणार 3 वर्ल्ड कप, भारत-पाकिस्तान 4 वेळा आमने-सामने कॉनवे याने या सामन्यात 125 वर्ष जुनं रेकॉर्डही तोडलं आहे. याआधी इंग्लंडमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच सर्वाधिक रन करण्याचा विक्रम रणजीतसिंगजी यांच्या नावावर होता. रणजीतसिंगजी यांनी 1896 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडमध्ये 154 नाबाद रनची खेळी केली होती.