144 वर्षांच्या इतिहासातील पहिलीच घटना, फुटबॉल चॅम्पियन देशात होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट

144 वर्षांच्या इतिहासातील पहिलीच घटना, फुटबॉल चॅम्पियन देशात होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 144 वर्षांच्या इतिहासात यापूर्वी कधीही न घडलेली घटना यावर्षी घडणार आहे. युरो कप आणि वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेटची तिरंगी मालिका होणार आहे.

  • Share this:

 bमुंबई, 23 जून: आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 144 वर्षांच्या इतिहासात यापूर्वी कधीही न घडलेली घटना यावर्षी घडणार आहे. युरो कप आणि वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या स्पेनमध्ये (Spain) आंतरराष्ट्रीय वन-डे मॅच होणार आहे. यापूर्वी युरोपातील नेदरलँड (Netherlands) देशातही आंतरराष्ट्रीय क्रिकेट झाले होते. त्यानंतर स्पेन वन-डे स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. स्कॉटलंड, नामिबिया आणि नेपाळ या देशांची तिरंगी मालिका स्पेनमध्ये होणार आहे. 20 जुलैपासून ही ऐतिहासिक मालिका सुरू होईल.

कोरोनामुळे निर्णय

कोरोना व्हायरसचा (coronavirus) क्रिकेट विश्वाला मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे अनेक आंतरराष्ट्रीय मालिका रद्द झाल्या किंवा त्याच्या वेळापत्रकामध्ये बदल करावे लागले. ही स्पर्धा देखील स्कॉटलंडमध्ये होणार होती. पण कोरोनामुळे स्पेनमध्ये घेण्याचा निर्णय आयसीसीनं घेतला आहे.

या स्पर्धेत वर्ल्ड कप लीगच्या क्वालिफायर सामन्यांसह तिरंगी मालिकेचा समावेश आहे. 20 ते 30 जूलै दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. त्याचबरोबर युरोपीय महिला टी20 वर्ल्ड कप क्वालिफायर आणि युरोपीय अंडर 19 वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धा देखील स्पेनमध्ये होणार आहेत. 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर दरम्यान या स्पर्धा होतील.

विराटनं दिवसाच्या शेवटच्या बॉलवर काढला रन, आज कोण करेल खेळाची सुरूवात?

यापूर्वी नेपाळमध्ये मागच्या वर्षी होणाऱ्या दोन मालिका अमेरिका आणि ओमानमध्ये घ्याव्या लागल्या. आयपीएल स्पर्धेचा 13 वा सिझन (IPL 2020) कोरोना महामारीमुळे यूएईमध्ये घ्यावा लागला होता. तर भारतामध्ये सुरु झालेला 14 वा सिझन (IPL 2021) बायो-बबलमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानं स्थगित करावा लागला. आता उर्वरित सिझन सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये होणार आहे. पाकिस्तान सुपर लीग (PSL 2021) स्पर्धा देखील कोरोनामुळे स्थगित करावी लागली होती. ती सध्या यूएईममध्ये सुरू आहे. तर भारतामध्ये यावर्षी होणारा टी20 वर्ल्ड कप देखील कोरोनामुळे अन्यत्र होण्याची दाट शक्यता आहे.

Published by: News18 Desk
First published: June 23, 2021, 1:11 PM IST

ताज्या बातम्या