WTC Final : विराटनं दिवसाच्या शेवटच्या बॉलवर काढला रन, आज कोण करेल खेळाची सुरूवात?

WTC Final : विराटनं दिवसाच्या शेवटच्या बॉलवर काढला रन, आज कोण करेल खेळाची सुरूवात?

विराटनं (Virat Kohli) दिवसाच्या शेवटच्या बॉलवर एक रन काढला. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी खेळाची सुरुवात कोण करणार? विराट कोहली की चेतेश्वर पुजारा? (Cheteshwar Pujara) हा प्रश्न आहे.

  • Share this:

साऊथम्पटन, 23 जून :  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final) सध्या रंगतदार अवस्थेत आहे. या टेस्टमध्ये टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये 217 रनवर ऑल आऊट झाली. न्यूझीलंडने 249 रन काढत 32 रनची आघाडी घेतली. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर इशांत शर्माला 3 विकेट मिळाल्या. आर.अश्विनला 2 आणि जडेजाला 1 विकेट घेण्यात यश आलं. न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनवेने सर्वाधिक 54 रन केले, तर कर्णधार केन विलियमसनने 49 रनची चिवट खेळी केली.

32 रननं पिछाडीवर असलेल्या टीम इंडियाला दुसऱ्या इनिंगमध्ये भक्कम सुरुवातीची गरज होती. पण शुभमन गिल (Shubman Gill) 8 रन काढून आऊट झाला. त्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील 30 रनवर आऊट झाल्यानं भारताला मोठा धक्का बसला. न्यूझीलंडकडून बॅटींगमध्ये उपयुक्त खेळी केलेल्या टीम साऊदीने (Tim Southee) दोन्ही विकेट्स घेतल्या.

विराट-पुजारानं टाळली पडझड

रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) मैदानात उतरला. त्याने चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) मदतीने पाचव्या दिवशी आणखी पडझड होऊ दिली नाही. पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजारा 12 तर विराट 8 रन काढून खेळत होते.

न्यूझीलंडकडून पाचव्या दिवसाची शेवटची ओव्हर काईल जेमीसननं टाकली. विराट कोहलीनं ती ओव्हर खेळून काढली. जेमीसनच्या त्या ओव्हरमध्ये एका वाईड बॉलमुळे मिळालेल्या अतिरिक्त रनसह 6 रन निघाले. दिवसाच्या शेवटच्या बॉलवर विराटनं एक रन काढला.

आज कोण करेल खेळाची सुरुवात?

विराट कोहलीनं दिवसाच्या शेवटच्या बॉलवर एक रन काढला. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी खेळाची सुरुवात कोण करणार? विराट कोहली की चेतेश्वर पुजारा? एक ओव्हर संपल्यानंतर लागू होणारा नियम दिवस संपल्यानंतर होतो का? दिवस संपल्यानंतर काही वेगळा नियम असतो?  आता नव्या दिवसाच्या पहिल्या बॉलवर स्ट्राईक कोण घेणार? असे प्रश्न काही क्रिकेट फॅन्सना पडले आहेत.

फायनल मॅच ड्रॉ झाली तरी टीम इंडियाचं मोठं नुकसान, न्यूझीलंडला फायदा

टेस्ट क्रिकेटमध्ये याबाबतचा नियम स्पष्ट आहे. दिवसाच्या नियमित ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर एक किंवा तीन रन करणाऱ्या बॅट्समनला पुढच्या ओव्हरमधील पहिला बॉल खेळण्याची संधी मिळते. हाच नियम टेस्ट मॅचमध्ये आदल्या दिवशी शेवटच्या बॉलवर रन काढणाऱ्या खेळाडूच्या बाबतीतही लागू होणार आहे. त्यामुळे सहाव्या दिवशी खेळाची सुरुवात चेतेश्वर पुजारा नाही तर विराट कोहली करणार आहे.

Published by: News18 Desk
First published: June 23, 2021, 12:47 PM IST

ताज्या बातम्या