जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Suresh Raina : 'मिस्टर आयपीएल' सुरेश रैनाची सर्व प्रकारातून निवृत्ती, 2 दशकांची कारकिर्द समाप्त

Suresh Raina : 'मिस्टर आयपीएल' सुरेश रैनाची सर्व प्रकारातून निवृत्ती, 2 दशकांची कारकिर्द समाप्त

एकेकाळी युवराज आणि रैनाने माजी कॅप्टन एमएस धोनीसोबत मिळून जशी कामगिरी केली होतील, तशीच कामगिरी पुन्हा हे दोघं आताच्या कॅप्टनसोबत करू शकतात

एकेकाळी युवराज आणि रैनाने माजी कॅप्टन एमएस धोनीसोबत मिळून जशी कामगिरी केली होतील, तशीच कामगिरी पुन्हा हे दोघं आताच्या कॅप्टनसोबत करू शकतात

Suresh Raina: मिस्टर आयपीएल (MR. IPL), चेन्नई सुपर किंग्सची भिंत (Chennai Super Kings) चिन्ना थाला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनानं क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 6 सप्टेंबर : मिस्टर आयपीएल (MR. IPL), चेन्नई सुपर किंग्सची भिंत (Chennai Super Kings), चिन्ना थाला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनानं क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. (Suresh Raina  announced his retirement from all formats) रैनानं 2 वर्षांपूवी 15 ऑगस्ट 2020 रोजी महेंद्रसिंह धोनीसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आयपीएल 2020 मधून रैनानं शेवटच्या क्षणी माघार घेतली होती. त्यानंतर तो सीएसकेसाठी आयपीएल 2021 खेळला. त्यावर्षी सीएसकेनं आयपीएलचं विजेतेपद मिळवलं, पण, रैनाची बॅट चालली नाही. त्यानंतर मागील वर्षी झालेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये कोणत्याही टीमनं त्याला खरेदी केले नव्हते. सुरेश रैनानं 2002 साली फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तब्बल 2 दशकांनी त्याने कारकिर्दीला अलविदा केला आहे. त्याने सोशल मीडियावर ही घोषणा केली. यावेळी त्यानं बीसीसीआय, उत्तर प्रदेश क्रिकेट तसेच चेन्नई सुपर किंग्सचे आभार मानले आहेत.

जाहिरात

निवृत्तीनंतर रैना लिजंड्स लीगमध्ये खेळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विदेशी लीगमध्ये खेळण्यासाठीही त्यानं बीसीसीआयकडे एनओसी मागितली असल्याचं वृत्त आहे. अश्विन, अक्षर, कार्तिकपैकी कुणाला संधी? कशी असेल श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग XI? रैनाची आयपीएल कारकिर्द आयपीएल विश्वातील यशस्वी खेळाडूंमध्ये रैनाचे नाव आघाडीवर आहे. त्यानं 205 सामन्यांमध्ये 32.52 ची सरासरी आणि 136.76 च्या स्ट्राईक रेटनं 5528 रन केले आहेत. यामध्ये 1 सेंच्युरी आणि 39 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये रैना पाचव्या क्रमांकावर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात