श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत रोहित किंवा विराटपेक्षा सर्वांची नजर भारताच्या प्लेईंग इलेव्हनवर असणार आहे. या निर्णायक सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल अपेक्षित आहेत.
रोहित शर्मा आणि लोकेश राहुल सलामीला येतील. तर तिसऱ्या नंबरवर विराट कोहलीची जागा फिक्स आहे. विराट यंदाच्या आशिया चषकात चांगल्या फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरुद्धही तोच फॉर्म कायम राहावा अशी क्रिकेट रसिकांची अपेक्षा राहील
सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर टीम इंडियाचा परफेक्ट फलंदाज आहे. यावर्षी सूर्यानं टी20त भारताकडून सर्वाधिक धावा फटकावल्या आहेत
पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या मुकाबल्यात सामनावीर ठरलेला हार्दिक पंड्या दुसऱ्या सामन्यात मात्र फारसा प्रभाव टाकू शकला नाही. पण श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याची कामगिरी भारतासाठी महत्वाची ठरेल.
रवींद्र जाडेजाच्या जागी योग्य पर्याय कोण? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. दीपक हुडा, अक्षर पटेल की रवीचंद्रन अश्विन यांच्यापैकी उद्या कोण खेळणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.
दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत यापैकी एकालाच संधी मिळण्याची शक्यता आहे. अशा वेळी रिषभ पंतला संघव्यवस्थापनाकडून झुकतं माप मिळेल.
गोलंदाजीत आवेश खानला पुन्हा संधी मिळू शकते. भुवनेश्वर आणि अर्शदीपवर गोलंदाजीची महत्वाची जबाबदारी राहील. संभाव्य प्लेईंग इलेव्हन - रोहित (कर्णधार), राहुल, विराट, सूर्यकुमार, रिषभ पंत, हार्दिक, हुडा, अश्विन, भुवनेश्वर, अर्शदीप, आवेश