मुंबई, 3 जानेवारी : टेस्ट क्रिकेटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या न्यूझीलंड क्रिकेट टीमचा बांगलादेशनं घाम काढला आहे. दोन्ही देशांमध्ये पहिली टेस्ट (Bangladesh vs New Zealand) सध्या माऊंट मॉन्गनुईमध्ये सुरू आहे. या टेस्टचा सोमवारी तिसरा दिवस होता. या दिवसावर बांगलादेशनं वर्चस्व गाजवत आघाडी घेतली आहे.न्यूझीलंडनं पहिल्यांदा बॅटींग करत डेवॉन कॉनवेच्या (Devon Conway) शतकाच्या जोरावर पहिल्या इनिंगमध्ये 328 रन काढले. त्याला उत्तर देताना बांगलादेशनं कमाल केली आहे. बांगलादेशनं तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस 6 आऊट 401 रन केले. बांगलादेशकडे पहिल्या इनिंगमध्ये सध्या 73 रनची आघाडी असून त्यांच्या 4 विकेट्स शिल्लक आहेत. त्यामुळे या टेस्टच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये बांगलादेशला मॅच जिंकण्याची संधी आहे. तिसऱ्या दिवशी कॅप्टन मोमीनउल हक आणि लिटन दास या दोघांचेही शतक हुकले.
Bangladesh dominate day three; finish with 401/6, leading by 73 runs.#NZvBAN | #WTC23 | https://t.co/tytB0US2qJ pic.twitter.com/26eCWHfav1
— ICC (@ICC) January 3, 2022
हकने 244 बॉलमध्ये 12 फोरच्या मदतीने 88 रन काढले. तर विकेट किपर बॅटर असलेल्या लिटन दासनं 177 बॉलमध्ये 10 फोरच्या मदतीनं 86 रनची खेळी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 158 रनची भागिदारी केली. ट्रेंट बोल्टनं दोघांनाही आऊट केले. विराट कोहली दुसऱ्या टेस्टमधून आऊट, टीम इंडियाला मोठा धक्का महमूदूल हसन जॉयने पहिल्या विकेटसाठी शादमान इस्लाम सोबत 43 रनची पार्टनरशिप केली. त्यांनी 18 ओव्हर्स खेळून काढत नव्या बॉलची चमक कमी केली. बांगलादेशच्या ओपनर्सनी केलेल्या संयमी खेळाचा फायदा मिडल ऑर्डरला मिळाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या नजमूलनं 109 बॉलचा सामना करत 64 रन काढले. त्याने महमूदूल हसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 104 रनची पार्टनरशिप केली.