मुंबई, 16 सप्टेंबर : टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मा (Rohit Sharma) हा त्याच्या आक्रमक बॅटींगमुळे 'हिट मॅन' म्हणून क्रिकेट विश्वात प्रसिद्ध आहे. क्रिकेटमधील सर्वच फॉरमॅटमध्ये रोहितनं त्याच्या खेळानं ठसा उमटवला आहे. इंग्लंड विरुद्ध नुकत्याच झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये रोहितनं टीम इंडियाकडून सर्वात जास्त रन केले होते. आता आयपीएल स्पर्धेत रोहित मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व करणार असून विजेतेपदाची हॅट्ट्रिक पूर्ण करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
'हिटमॅन' रोहित प्रमाणे आता 'सुपर मॅन' रोहितचा क्रिकेट विश्वात उदय झाला आहे. हा सुपरमॅन रोहित नेपाळचा आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड लीग 2 (ICC Cricket World League 2) स्पर्धेत त्यानं ही कमाल केली आहे. रोहित पौडेल (Rohit Paudel) असं या 'सुपर मॅन'चं नाव असून त्यानं बाऊंड्री लाईनवर घेतलेल्या भन्नाच कॅचची आयसीसीनं देखील प्रशंसा केली आहे.
ओमानच्या इनिंगमधील 26 व्या ओव्हरमध्ये जतिंदर सिंहनं लॉग ऑनच्या दिशेला एक जोरदार फटका मारला होता. तो शॉट पाहून बॉल सहज बाऊंड्री लाईन ओलांडेल असा सर्वांचा अंदाज होता. मात्र रोहितनं त्यावेळी असं काही केलं की ते पाहून सर्वजन आश्चर्यचकित झाले. त्यानं बाऊंड्री लाईनच्या जवळ जात उडी मारत एका हातानं बॉल आतमध्ये टाकला. त्यानंतर पुन्हा उडी मारत कॅच घेतला. त्याच्या या कॅचमुळे जतिंदर सिंहची 107 रनची खेळी संपुष्टात आली.
Simply ridiculous from Nepal's Rohit Paudel
Watch the Men’s CWC League 2 match live on https://t.co/CPDKNxoJ9v and @FanCode (in the sub-continent) pic.twitter.com/m6ZxYIPiya — ICC (@ICC) September 15, 2021
IPL 2021: 'अहो, तुमच्याकडं पाणी येतंय का?' सूर्यानं दिला खालच्या मजल्यावरील बुमराहाला आवाज!
ओमानचा सहज विजय
रोहितचा हा जबरदस्त कॅच नेपाळचा पराभव टाळू शकला नाही. नेपाळनं ओमानला 197 रन्सचं टार्गेट दिलं होतं, ते ओमाननं 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. ओमानकडून जतिंदर सिंहनं 62 बॉलमध्ये 107 रनची खेळी केली. ओमानचा या लीगमधील हा 9 वा विजय असून त्यांनी पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.