मुंबई, 16 सप्टेंबर: आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) टीम सज्ज झाली आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेले मुंबईचे खेळाडू यूएईमध्ये दाखल झाले आहेत. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे मुंबईचे खेळाडू इंग्लंडमधून यूएईमध्ये दाखल झाले आहेत. त्यांना नियमानुसार सहा दिवस क्वारंटाईन राहणे बंधनकारक आहे. बुमराह आणि सूर्या यांच्या क्वारंटाईन काळातील एक फोटो मुंबई इंडियन्सनं शेअर केला असून त्याला दिलेल्या भन्नाट कॅप्शनमुळे तो फोटो सध्या चांगलाच चर्चेत आहे.
मुंबई इंडियन्सची सोशल मीडिया टीम ही नेहमीच हटके कामासाठी प्रसिद्ध आहे. या फोटोत सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी (Devisha Shetty) हे दिसत असून ते खालच्या मजल्यावरील जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) यांच्याशी गप्पा मारत आहेत. ''अहो! तुमच्या कडे पाणी येतंय का?", अशी विचारणा सूर्या बुमराहला विचारत असावा अशा भन्नाट कॅप्शनसह मुंबई इंडियन्सनं हा फोटो शेअर केला आहे.
आला रे... मुंबई इंडियन्सच्या मराठमोळ्या थीम साँगचा VIDEO पाहिला का?
मुंबई इंडियन्सची पहिली लढत 19 सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्सशी (Mumbai Indians vs Chennai Super Kings) होणार आहे. मुंबईनं पहिल्या टप्प्यात 7 पैकी 4 सामने जिंकले असून 8 पॉईंट्ससह मुंबईची टीम पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.