जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा होणार बाबा, नताशाकडे आहे Good News

हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा होणार बाबा, नताशाकडे आहे Good News

हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा होणार बाबा, नताशाकडे आहे Good News

टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर त्याची पत्नी नताशा पुन्हा एकदा प्रेग्नंट (Natasa Stankovic Pregnant) असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 डिसेंबर : टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) सर्बियाची मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टेनकोविकशी (Natasa Stankovic) लग्न आणि नंतर प्रेग्नसीची बातमी देत सर्वांना धक्का दिला होता. या दोघांना जुलै 2020 मध्ये मुलगा झाला. आता ख्रिसमसच्या दिवशी हार्दिक पांड्यानं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर नताशा पुन्हा एकदा प्रेग्नंट (Natasa Stankovic Pregnant) असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हार्दिकनं शेअर केलेल्या या फोटोत नताशाचा बेबी बम्प (Baby Bump) स्पष्ट दिसत आहे. या फोटोनंतर ती पुन्हा एकदा आई होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण, हार्दिक किंवा नताशानं याबाबत अजून कोणतीही घोषणा केलेली नाही. हा फोटो शेअर करत हार्दिकनं सर्व फॅन्सना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. ‘सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून मेरी ख्रिसमस’ असं कॅप्शन हार्दिकनं या फोटोला दिले आहे. त्याचबरोबर नताशानंही फोटो शेअर करत फॅन्सना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

News18

हार्दिक पांड्याच्या कारकिर्दीला 2019 पासून दुखापतींचं ग्रहण लागलेलं आहे. फिटनेसने त्रस्त असलेला हार्दिक टी-20 वर्ल्ड कपच्या सगळ्या मॅच खेळला, पण त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. सुपर-12 मध्येच टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं. हार्दिकचा खराब फिटनेसही भारताच्या खराब कामगिरीचं प्रमुख कारण ठरलं. या कारणामुळे हार्दिकची न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठीही टीम इंडियात निवड झाली नाही. IND vs PAK : पराभवानंतरही भारताला मिळाले 4 हिरो, एक बारावीत, दुसऱ्याला पूर्ण करायचंय वडिलांचं स्वप्न हार्दिकनं सध्या फिटनेस चांगला करण्यावर फोकस केला असून त्यासाठी विजय हजारे स्पर्धेतूनही माघार घेतली होती. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी जाणाऱ्या वन-डे टीमची निवड अद्याप जाहीर झालेली नाही. पण, या दौऱ्यात हार्दिकला संधी मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात