Home /News /sport /

सुनील गावसकरांनी 33 वर्षांनी घेतला मोठा निर्णय, नामुश्की टाळण्यासाठी उचललं पाऊल

सुनील गावसकरांनी 33 वर्षांनी घेतला मोठा निर्णय, नामुश्की टाळण्यासाठी उचललं पाऊल

म्हाडामार्फत (MHADA) सुनील गावस्कर क्रिकेट फाउंडेशन ट्रस्टला (Sunil Gavaskar foundation trust) 1980 च्या दशकामध्ये ही जमीन देण्यात आली होती. मात्र अद्यापही तिथं कोणतीही अकादमी उभी करण्यात आली नव्हती.

    मुंबई, 4 मे : महान क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी त्यांच्याकडील  जमीन अखेर 33 वर्षांनी म्हाडाला परत केली आहे. मुंबईतील वांद्रे पश्चिन (Bandra West) या भागातील मोक्याच्या ठिकाणी असलेला 21,348 चौरस फुटांचा हा भूखंड गावसकर यांना क्रिकेट अकादमी सुरू करण्यासाठी देण्यात आला होता. गावसकर हे त्या ठिकाणी अकादमी बांधू न शकल्यानं त्यांनी अखेर ही जमीन परत केली आहे. म्हाडामार्फत (MHADA) सुनील गावस्कर क्रिकेट फाउंडेशन ट्रस्टला (Sunil Gavaskar foundation trust) 1980 च्या दशकामध्ये ही जमीन देण्यात आली होती. मात्र अद्यापही तिथं कोणतीही अकादमी उभी करण्यात आली नव्हती. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ((Jitendra Awhad) यांनी काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर या विषयावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आव्हाड यांच्या नाराजीनंचर सरकार ही जमीन गावसरकांच्या ताब्यातून घेणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता गावसकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आपल्याला पत्र लिहून आपण त्या जागेवर क्रिकेट अकादमी उभा करू शकत नाहीत, त्यामुळे ही जमीन परत करत असल्याचं कळवलं आहे, अशी माहिती आव्हाड यांनी दिल्याचं वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया' नं दिलं आहे. सुनील गावसकर यांनीही आपल्या ट्रस्टनं ही जमीन परत केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'क्रिकेट अकादमी सुरू करणे हे माझं स्वप्न होतं, पण माझ्या सध्याच्या कामामुळे हे स्वप्न पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे म्हाडानं त्यांना योग्य वाटेल त्या पद्धतीनं या जागेचा विकास करावा. याबाबत माझी कोणतीही मदत लागली तर मी ती देण्यास तयार आहे,' असे गावसकर यांनी स्पष्ट केले. 'आत्तापर्यंत काहीच करु शकला नाही' KKR च्या फ्लॉप प्लेअरला गावस्करांनी फटकारले गावसकर यांनी ही जमीन परत केल्यानंतर त्या जागेच्या खेळासाठी कसा वापर करता येईल याबातच्या पर्यायावर राज्य सरकार विचार करत असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Jitendra awhad, Mhada 2022, Mumbai, Sunil gavaskar

    पुढील बातम्या