मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022, MI vs RCB Dream11 Team Prediction : 'हे' 11 खेळाडू तुमच्यासाठी ठरणार निर्णायक

IPL 2022, MI vs RCB Dream11 Team Prediction : 'हे' 11 खेळाडू तुमच्यासाठी ठरणार निर्णायक

आयपीएल 2022 मधील आजची (शनिवार) दुसरी मॅच मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (MI vs RCB) यांच्यात होणार आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) या मॅचमध्ये आमने-सामने येणार आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 9 एप्रिल : आयपीएल 2022 मधील आजची (शनिवार) दुसरी मॅच मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (MI vs RCB) यांच्यात होणार आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) या मॅचमध्ये आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबई इंडियन्सनं या सिझनमधील पहिले तीनही सामने गमावले असून त्यांना पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. तर आरसीबीनं 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यांची टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.

मुंबई इंडियन्सला कॅप्टन रोहित शर्माकडून मोठी अपेक्षा आहे. त्यानं 3 मॅचमध्ये 54 रन केले आहे.  इशान किशन आणि तिलक वर्मा यांनी चांगलंच प्रभावित केलंय. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव आणि डेवाल्ड ब्रेविस यांच्या आगमनानं मुंबईची बॅटींग आणखी भक्कम झालीय. आयपीएलच्या सर्वात यशस्वी टीमला त्यांची बॉलिंग आणखी चांगली करणे आवश्यक आहे.

आरसीबीचा कॅप्टन फाफ ड्यू प्लेसिस चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्याचबरोबर दिनेश कार्तिक आणि शाहबाद अहमद यांनी मागच्या विजयात मोठे योगदान दिले होते. विराट कोहलीनं चांगली इनिंग खेळावी अशी आरसीबीच्या फॅन्सची अपेक्षा असेल. या मॅचसाठी ग्लेन मॅक्सवेल उपलब्ध असल्यानं आरसीबीची टीम आणखी बळकट झाली आहे.

MI vs RCB Dream 11 Team Prediction, IPl 2022:

विकेटकीपर: दिनेश कार्तिक

कॅप्टन: इशान किशन

व्हाईस कॅप्टन: वानिंदु हसरंगा

बॅटर: फाफ डू प्‍लेसी, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, तिलक वर्मा

बॉलर्स: हर्षल पटेल, टायमल मिल्‍स, जसप्रीत बुमराह

IPL 2022 : .... तर CSK चं काहीही होणार नाही! माजी क्रिकेटपटूनं दिला गंभीर इशारा

मुंबईची टीम: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, अनमोलप्रीत सिंग, डेवाल्ड ब्रेव्हीस, आर्यन जुयाल, इशान किशन, कायरन पोलार्ड, ऋतिक शौकीन, अर्जुन तेंडुलकर, संजय यादव, डॅनियल सॅम्स, टीम डेव्हिड, फॅबियन एलन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद अर्षद खान, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, जोफ्रा आर्चर, टायमल मिल्स, रिले मेरेडिथ, मुरुगन अश्विन, बसील थंपी

आरसीबीची टीम:  विराट कोहली, फाफ ड्यू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, फिन अ‍ॅलन, अनुज रावत, महिपाल लोमरोर, सुयश प्रभूदेसाई, रदरफोर्ड, हसरंगा, हर्षल पटेल, शाहबाज अहमद, आकाशदीप, अनिश्वर गौतम, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा, चमा मिलिंद, जोश हेजलवूड, जेसन बेहरनड्रॉफ, सिद्धार्थ कौल, लवनिथ सिसोदीया, डेव्हिड विली

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, RCB