रांची, 10 जून : आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धा स्थगित झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) त्यांच्या रांचीमधील घरी आहे. धोनी रांचीमधील फार्म हाऊसवर सेंद्रीय शेती करण्यासोबतच पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवत आहे. धोनीची पत्नी साक्षी (Sakshi) वेळोवेळी त्याच्या फार्म हाऊसचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. धोनीनं नुकताच स्कॉटलंडमधील खास घोडा खरेदी केला आहे. साक्षीनं इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे घोडा आणि कुत्रा यांची शर्यत लागली आहे. धोनीला बाईक्स सोबत पाळीव प्राण्यांचेही वेड आहे.स्कॉटलंडहून रांचीला आलेला 2 वर्षांचा हा घोडा जगातल्या सगळ्यात लहान जातीच्या घोड्यांपैकी एक आहे. या घोड्याची उंची 3 फूटांच्या आसपास असते. शेटलँड पोनी जातीचा घोडा त्याच्या वेगासाठी नाही, तर सजावटीसाठी ओळखला जातो. या घोड्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमतही खूप जास्त आहे.
याआधी धोनीने चेतक नावाचा घोडा विकत घेतला होता. धोनीची पत्नी साक्षीने या घोड्याचा व्हिडिओ शेयर केला आणि तो कुटुंबाचा एक सदस्य असल्याचं सांगितलं. तसंच तिने धोनी घोड्याला मसाज करत असल्याचा फोटोही साक्षीने शेयर केला होता. डीव्हिलियर्सच्या मुलीसोबत विराटच्या Vamika चा फोटो VIRAL ? अनुष्कानेही दिली प्रतिक्रिया आयपीएल स्थगित झाल्यानंतर धोनी त्याच्या कुटुंबासोबत पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवत आहे. बीसीसीआयने आयपीएलचा उरलेला मोसम युएईत सप्टेंबर महिन्यात खेळवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे धोनी पुन्हा युएईला रवाना होईल.