Home /News /sport /

महेंद्रसिंह धोनी सध्या काय करतोय? साक्षीनं शेअर केला मजेदार VIDEO

महेंद्रसिंह धोनी सध्या काय करतोय? साक्षीनं शेअर केला मजेदार VIDEO

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) मैदानावर जितका कुल आहे, तितकाच शांत तो मैदानाच्या बाहेर देखील आहे. धोनीची पत्नी साक्षीनं (Sakhi Dhoni) माहीचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

  मुंबई, 3 जानेवारी : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) मैदानावर जितका कुल आहे, तितकाच शांत तो मैदानाच्या बाहेर देखील आहे. धोनीचे बाईक प्रेम सर्वांनाच माहिती आहे. त्याचबरोबर धोनीला प्राण्यांबद्दलही प्रेम आहे. रांचीमधील धोनीचे फार्म  हाऊस हे याचे उदाहरण आहे. धोनीच्या या घरात अनेक विदेशी जातीचे कुत्रे आणि घोडे आहेत. धोनीला वेळ मिळाला की तो या मित्रांसोबत घालवतो. साक्षीनं धोनीचा या मित्रांसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत धोनीचा खास घोडा देखील आहे. हा घोडा त्याने मागच्या वर्षी खरेदी केला होता. चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) देखील याचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. तर साक्षीने धोनीच्या या सर्व मित्रांचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
  या व्हिडीओत धोनी सोफ्यावर बसलेला असून तो घोड्याला काही तरी खाऊ घालत आहे. माझ्यासाठी ही गोष्ट खूप सोपी होती असे कॅप्शन या व्हिडीओला दिले आहे. हा व्हिडीओ शेअर होताच व्हायरल झाला आहे. त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. टीम इंडियाचा ओपनर केएल राहुल (KL Rahul) याने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. तर, 'दोन लीजेंड एकत्र' अशी प्रतिक्रिया एका युझरनं दिली आहे. IND vs SA: विराट-द्रविड करणार टीम इंडियात बदल! अशी असेल Playing 11 धोनीसाठी मागचे वर्ष चांगलेच यशस्वी ठरले. त्याच्या कॅप्टनसीमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) पराभूत करत चौथ्यांदा आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. धोनीला पुढील सिझनसाठी सीएसकेने 12 कोटी देऊन रिटेन केले आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Csk, MS Dhoni, Sakshi dhoni

  पुढील बातम्या