जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA: विराट-द्रविड करणार टीम इंडियात बदल! अशी असेल Playing 11

IND vs SA: विराट-द्रविड करणार टीम इंडियात बदल! अशी असेल Playing 11

IND vs SA: विराट-द्रविड करणार टीम इंडियात बदल! अशी असेल Playing 11

टीम इंडियाला जोहान्सबर्गमध्ये आजपासून (सोमवार) सुरू होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये (India vs South Africa) इतिहास घडवण्याची संधी आहे. या टेस्टसाठी टीम इंडियात 2 बदल अपेक्षित आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 जानेवारी : टीम इंडियाला जोहान्सबर्गमध्ये आजपासून (सोमवार) सुरू होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये  (India vs South Africa) इतिहास घडवण्याची संधी आहे. भारतीय क्रिकेट टीमनं आजवर दक्षिण आफ्रिकेत एकही टेस्ट सीरिज जिंकलेली नाही. सेंच्युरियन टेस्ट जिंकल्यानंतर टीम इंडियाकडे सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी आहे. आता जोहान्सबर्गमध्येही जिंकून एक टेस्ट बाकी असताना सीरिज जिंकण्याची संधी टीम इंडियाला आहे. जोहान्सबर्गची खेळपट्टी पाहता टीममध्ये दोन बदल होऊ शकतात. शार्दुल ठाकूरऐवजी (Shardul Thakur) फास्ट बॉलर उमेश यादवचं (Umesh Yadav) टीममध्ये पुनरागमन होऊ शकतं, तर अश्विनऐवजी (R Ashwin) अतिरिक्त बॅटर मैदानात उतरण्याची शक्यता आहे. टीमने असा निर्णय घेतला तर हनुमा विहारीला (Hanuma Vihari) संधी मिळू शकते. उमेश यादवची स्विंग बॉलिंग भारतासाठी फायद्याची ठरू शकते. शार्दुल ठाकूरला सेंच्युरियन टेस्टमध्ये बॉल आणि बॅटने प्रभाव पाडता आला नाही. त्याने 14 रन करण्यासोबतच 16 ओव्हरमध्ये बॉलिंग करून फक्त 2 विकेट घेतल्या.जोहान्सबर्ग टेस्टमध्ये भारत स्पिनर मैदानात उतरवणार का? हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेत काही दिवसांपूर्वी खेळण्याचा अनुभव असलेल्या हनुमा विहारीला संधी मिळू शकते. दुसरिकडे दक्षिण आफ्रिकेचा विकेट किपर क्विंटन डी कॉक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्याच्या जागेवर स्थानिक क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेल्या रेयान रिकेल्टनचा समावेश नक्की आहे. दक्षिण आफ्रिकेची टीम या मॅचमध्ये 5 फास्ट बॉलर्ससह उतरू शकते. तसं झालं तर केशव महाराजच्या जागी डुआने ओलिवियरचा समावेश होऊ शकतो. महाराजला सेंच्युरियन टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये एकही विकेट मिळाली नव्हती. तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला बॉलिंगही देण्यात आली नाही. जोहान्सबर्गमध्ये इतिहास घडवण्याची टीम इंडियाला संधी, कधी आणि कुठे पाहणार मॅच? टीम इंडियाची संभाव्य Playing 11 : केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, हनुमा विहारी, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज. दक्षिण आफ्रिकेची संभाव्य Playing 11 : डीन एल्गर (कप्तान), एडेन मार्कराम, कीगन पीटरसन, रासी वान डेर डुसेन, रेयान रिकेल्टन, टेम्बा बावूमा, वियान मूल्दर, डुआने ओलिवियर, कगिसो रबाडा, मार्को जेन्सन आणि लुंगी एन्गिडी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात