जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / धोनीनं पुन्हा जिंकलं मन, पाकिस्तानच्या खेळाडूला दिलं खास गिफ्ट

धोनीनं पुन्हा जिंकलं मन, पाकिस्तानच्या खेळाडूला दिलं खास गिफ्ट

धोनीनं पुन्हा जिंकलं मन, पाकिस्तानच्या खेळाडूला दिलं खास गिफ्ट

महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) सक्रीय क्रिकेटपासून दूर असला तरी क्रिकेटपटूंच्या नेहमी संपर्कात असतो. त्याने पाकिस्तानच्या खेळाडूला नुकतंच एक खास गिफ्ट पाठवलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 जानेवारी : पाकिस्तानचा क्रिकेटपटू हॅरीस राऊफ (Haris Rauf) टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) जबरदस्त फॅन आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात टी20 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या मॅचनंतर हॅरीस धोनीला भेटला होता. त्या दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. वर्ल्ड कपमधील त्या मॅचनंतर धोनीनं हॅरीसला खास भेट पाठवली आहे. धोनीनं हॅरीसला चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) स्वत:ची एक जर्सी भेट म्हणून पाठवली आहे. हॅरीसनं धोनीनं दिलेल्या या खास गिफ्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. धोनीचे त्याने आभार मानले असून याबद्दल खास प्रतिक्रिया देखील दिली आहे. ‘द लीजेंड आणि कॅप्टन कुल एमएस धोनीनं एका सुंदर भेटीसह त्याची जर्सी देऊन माझा गौरव केला आहे. द ‘7’ आजही त्याच्या दयाळू वृत्तामुळे सर्वांचे मन जिंकत आहे.’  असे हॅरीसने म्हंटले आहे. त्याचबरोबर त्याने ही भेट त्याच्यापर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे सीएसकेचे मॅनेजर रसेल यांचेही आभार मानले आहेत.

जाहिरात

सीएसकेच्या मॅनेजरनंही हॅरीस राऊफच्या ट्विटला उत्तर दिलं आहे. ‘आमचा कॅप्टन एमएस धोनी दिलेलं वचन नेहमी पूर्ण करतो. तुला हे गिफ्ट आवडले हे समजल्यानंतर आनंद झाला.’ असं उत्तर त्यांनी दिलं आहे. हे सर्व संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले असून धोनीच्या दिलदारपणाचे फॅन्सनी कौतुक केले आहे. Ashes: इंग्लंडच्या खेळाडूंवर प्रेक्षकांची शेरेबाजी, क्रिकेटपटूनेही दिलं उत्तर! VIDEO हॅरीस राऊफ सध्या बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळत आहे. त्याने टी20 वर्ल्ड कपमध्ये आठ विकेट्स घेतल्या होत्या. तो वर्ल्ड कपमधील पाकिस्तानचा दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी बॉलर होता. तर धोनी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा मेंटॉर होता. भारतीय टीमनं वर्ल्ड कपमधील पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धचे पहिले दोन सामने गमावले. त्यानंतर टीमचे आव्हान सुपर 12 मध्येच संपुष्टात आले. तर ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात