जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ashes: इंग्लंडच्या खेळाडूंवर प्रेक्षकांची शेरेबाजी, क्रिकेटपटूनेही दिलं उत्तर! VIDEO

Ashes: इंग्लंडच्या खेळाडूंवर प्रेक्षकांची शेरेबाजी, क्रिकेटपटूनेही दिलं उत्तर! VIDEO

Ashes: इंग्लंडच्या खेळाडूंवर प्रेक्षकांची शेरेबाजी, क्रिकेटपटूनेही दिलं उत्तर! VIDEO

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) चौथी टेस्ट सिडनीमध्ये सुरू आहे. या टेस्टच्या दरम्यान सिडनीतील प्रेक्षकांनी इंग्लिश खेळाडूंवर शेरेबाजी केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 जानेवारी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) चौथी टेस्ट सिडनीमध्ये सुरू आहे. या सीरिजमधील पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडच्या बॅटरनी चांगला प्रतिकार केला. तिसऱ्या दिवशी सकाळी इंग्लंडची अवस्था 4 आऊट 36 अशी झाली होती. त्यावेळी जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) या जोडीनं इंग्लंडला सावरले. बेअरस्टोने नंतर शतकही झळकावले. बेअरस्टो आणि स्टोक्स या जोडीने केलेल्या प्रतिकारामुळेच इंग्लंडने 294 रनपर्यंत मजल मारली.त्यांच्या खेळीचे अनेक क्रिकेट फॅन्स कौतुक करत आहेत. पण, त्याचवेळी सिडनीमध्ये बेन स्टोक्सला प्रेक्षकांकडून शेरेबाजी सहन करावी लागली. स्टोक्सला जाड असल्याची शेरेबाजी प्रेक्षकांनी केली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्टोक्स आणि बेअरस्टो एका सेशनचा खेळ संपवून ड्रेसिंग रूममध्ये परत येत असताना हा प्रकार घडला. स्टोक्सनं सुरूवातीला या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्या प्रेक्षकांनी बेअरस्टोवरही शेरेबाजी केली. ती ऐकून ड्रेसिंग रूममध्ये परत जात असलेला स्टोक्स तिथंच थांबला. त्याने त्या प्रेक्षकाला उत्तर देण्याचे ठरवले होते. त्यावेळी त्याच्या पाठीमागे असलेल्या बेअरस्टोनं त्याला अडवले. त्याने स्टोक्सची पाठ थोपटली आणि त्याला पुढे जाण्याचा सल्ला दिला.

जाहिरात

हा सर्व प्रकार घडला तेव्हा इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे संचालक एश्ले जाईल्स देखील तिथं उपस्थित होते. त्यांनी या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप केला नाही. मात्र नंतर बेअरस्टोनं दाखवलेल्या संयमाबद्दल त्याची पाठ थोपटली. या सर्व प्रकारानंतर स्टोक्स थोड्या वेळाने 66 रन काढून आऊट झाला. त्याने 91 बॉलमध्ये 9 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं ही खेळी केली. Ashes : हा VIDEO पाहून सचिनही धक्क्यात! ICC कडे केली नियम बदलण्याची मागणी इंग्लंडची पहिली इनिंग चौथ्या दिवशी 294 रनवर संपुष्टात आली. इंग्लंडकडून बेअरस्टोनं सर्वाधिक 113 रन काढले. या अ‍ॅशेस सीरिजमध्ये इंग्लिश बॅटरनं झळकावलेलं हे पहिलंच शतक आहे. ऑस्ट्रेलियानं पहिली इनिंग 8 आऊट 416 रनवर घोषित केली होती. त्यामुळे त्यांना पहिल्या इनिंगमध्ये 122 रनची महत्त्वाची आघाडी मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात