Home /News /sport /

विराट कोहलीने कॅप्टनसी सोडताच खरी ठरली धोनीची 'ती' भविष्यवाणी!

विराट कोहलीने कॅप्टनसी सोडताच खरी ठरली धोनीची 'ती' भविष्यवाणी!

विराट कोहलीनं (Virat Kohli) शनिवारी टेस्ट टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. विराटच्या या निर्णयानंतर टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) भविष्यवाणी पुन्हा एकदा खरी ठरली आहे.

    मुंबई, 16 जानेवारी : विराट कोहलीनं (Virat Kohli) शनिवारी टेस्ट टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. विराटने सोशल मीडियावर पोस्ट लिहून कॅप्टनसी सोडत असल्याची घोषणा (Virat Kohli quits Test Captaincy) केली. विराटच्या या निर्णयानंतर टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) भविष्यवाणी पुन्हा एकदा खरी ठरली आहे. त्याने 2017 साली याबाबतचे भविष्य व्यक्त केले होते. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वन-डे पूर्वी धोनीनं पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की, 'वेगवेगळ्या कॅप्टनसीचा प्रयोग (Split Captaincy) भारतासाठी उपयोगी नाही. माझ्यासाठी पुढे जाण्याची ही योग्य वेळ आहे. विराटच्या कॅप्टनसीमध्ये भारतीय टीम आजवरची सर्वात यशस्वी टीम होईल.' ऑस्ट्रेलियामध्ये 2014-15 च्या टेस्ट सीरिजमध्ये धोनीनं अचानक निवृत्ती घेतल्यानंतर विराट टेस्ट टीमचा कॅप्टन बनला होता. तेव्हा भारतामध्ये दोन वेगळ्या प्रकारासाठी वेगळे कॅप्टन होते. त्याचा लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये अनुकूल परिणाम झाला नाही. टीम इंडियाचा 2015 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये आणि 2016 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये पराभव झााला. त्याचवेळी विराटने टेस्टमध्ये एक मजबूत टीम तयार केली. या टीमनं सातत्याने विजय मिळवला. धोनीने लिमिटेड ओव्हर्समधील कॅप्टनसी सोडल्यानंतर सांगितले होते की, 'मी दोन कॅप्टनच्या पद्धतीवर विश्वास करत नाही. टीमचा नेता एकच हवा. हा प्रयोग भारतामध्ये उपयोगी नाही. मी योग्य वेळेची वाट पाहात होतो. विराटचे काम सोपे व्हावे ही माझी इच्छा होती. यामध्येही काहीही चुकीचे नाही. या टीममध्ये तीन्ही प्रकारात चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. माझ्या  मते पुढे जाण्याची ही योग्य वेळ आहे.' 'विराट'पर्वाचा अस्त! या वादग्रस्त निर्णयांमुळे कोहलीला सोडावी लागली कॅप्टन्सी? यापूर्वी 2007-08 या कालावधीत जवळपास वर्षभर टीम इंडियासाठी व्हाईट आणि रेड बॉल क्रिकेटमध्ये वेगवेगळे कॅप्टन होते. 2007 मधील इंग्लंड दौऱ्यानंतर राहुल द्रविडने कॅप्टनसीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर धोनीची टी20 आणि वन-डे टीमच्या कॅप्टनपदी नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी कुंबळे लिमिटेड ओव्हर क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. कुंबळे 2008 साली निवृत्त होईपर्यंत टेस्ट टीमचा कॅप्टन होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, MS Dhoni, Virat kohli

    पुढील बातम्या