मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /सलग पाच विजयानंतर महेंद्रसिंह धोनीसाठी आणखी एक Good News

सलग पाच विजयानंतर महेंद्रसिंह धोनीसाठी आणखी एक Good News

बुधवारी झालेल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 7 विकेट्सनं पराभव केला. चेन्नईच्या या कामगिरीनंतर आनंदी असलेल्या धोनीसाठी (MS Dhoni) आणखी गूड न्यूज (Good News) आयपीएल बाहेरुन आली आहे.

रांची, 29 एप्रिल : महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सची (CSK) या सिझनमधील (IPL 2021) कामगिरी जोरदार होत आहे. चेन्नईनं या सिझनमध्ये सलग 5 मॅच जिंकल्या आहेत. बुधवारी झालेल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 7 विकेट्सनं पराभव केला. चेन्नईच्या या कामगिरीनंतर आनंदी असलेल्या धोनीसाठी आणखी गूड न्यूज (Good News) आयपीएल बाहेरुन आली आहे.

धोनीच्या आई-वडिलांनी कोरोनावर मात केली असून त्यांना आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना आठवडाभरापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे रांचीतील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धोनीचे वडील पान सिंह (Paan Singh) आणि आई देविका देवी (Devika Devi) यांची प्रकृती ठीक असून ऑक्सिजन लेवलदेखील सामन्य आहे. आठवडाभराच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून यामध्ये धोनीचे आई-वडील राहत असलेले झारखंड राज्यही अपवाद नाही. झारखंडमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

आयपीएलवरही कोरोनाचं सावट

 कोव्हिड संक्रमणाच्या (Coronavirus) भीतीने आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतून (IPL 2021) माघार घेण्याचा ओघ सध्या सुरूच आहे. आधी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी तसंच काही अधिकाऱ्यांनी या स्पर्धेतून माघार घेतली होती. आता एलिट पॅनलमधले दोन अंपायर नितीन मेनन (Nitin Menon) आणि पॉल राफेल (Paul Reiffel) यांनी खासगी कारणांसाठी या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

IPL 2021 : ...तोपर्यंत आयपीएल संपणार नाही, BCCI ची परदेशी खेळाडूंना हमी

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार आई आणि पत्नी दोघांनाही कोरोनाची बाधा झाल्यामुळे नितीन मेनन त्यांच्या घरी इंदूरला निघून गेले आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे (Australia) अंपायर पॉल राफेल काही दिवसांपूर्वीच मायदेशी गेले आहेत.

First published:

Tags: Covid-19, Cricket, IPL 2021, MS Dhoni, Sports