मुंबई, 19 नोव्हेंबर: टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) पत्नी साक्षी धोनीचा (Sakshi Dhoni) आज (19 नोव्हेंबर) 33 वा वाढदिवस आहे. धोनी सध्या रांचीमध्ये कुटुंबासोबत आहे. साक्षीच्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन धोनीच्या घरी झालं. या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये साक्षी केक कापत असून धोनी तिच्या जवळ उभा आहे. धोनी आणि साक्षीचं लग्न जुलै 2010 मध्ये झालं असून त्यांना एक मुलगी देखील आहे. यंदाच्या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2021) साक्षी यूएईमध्ये उपस्थित होती. साक्षी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला जवळपास 45 लाख जण फॉलो करतात. साक्षी आणि धोनीची पहिली भेट 2007 साली एका हॉटेलमध्ये झाली होती. त्या हॉटेलात ती इंटर्न होती. साक्षी आणि धोनी दोघंही लहानपणापासून मित्र आहेत. दोघांचे वडीलही एकमेकांचे मित्र आहेत, अशी चर्चा अनेकदा होते, पण ते खरे नाही.
साक्षीनंच एका मुलाखतीमध्ये याचा खुलासा केला होता. ‘अनेकदा लोकं म्हणतात की मी आणि माही लहानपणापासून मित्र आहोत. आमचे घरचेही एकमेकांचे मित्र आहेत. पण माझ्यात आणि माहीमध्ये सात वर्षांचं अंतर आहे. आम्ही लहाणपणापासून मित्र नाहीत. मी रांचीमध्ये पहिल्यांदा 7 जुलै 2010 रोजी माहीच्या वाढदिवशी गेले होते.’ साक्षी आणि माहीचे लग्न डेहराडूनमध्ये झाले. त्यानंतर साक्षी पहिल्यांदा रांचीमध्ये आली होती. रोहित आणि अश्विनला नंबर 1 होण्याची संधी, पाहा घरच्या मैदानावर कसा आहे धोनीचा रेकॉर्ड भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरी टी20 मॅच धोनीचं शहर असलेल्या रांचीमध्ये होणार आहे. धोनी ही मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहणार का? याचीही सर्वांना चर्चा आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय सहाय यांनी सांगितलं की, ‘धोनी सध्या रांचीमध्येच आहे. तो आज टेनिस खेळण्यासाछी देखील उपस्थित होता. पण, तो मॅच पाहयला येणार का? हे आम्हाला सांगता येणार नाही.’