भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरी टी20 मॅच रांचीमध्ये होणार आहे. जयपूरमधील पहिली टी20 लढत टीम इंडियानं 5 विकेट्सनं जिंकली होती. आता रांचीमध्ये भारतीय टीम मालिका जिंकण्याच्या उद्देशानं मैदानात उतरणार आहे. या मॅचमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि आर. अश्विनला (R. Ashwin) नंबर 1 होण्याची संधी आहे. (AFP)
रांचीमध्ये टीम इंडियानं आजवर दोन्ही मॅच जिंकल्या आहेत. या स्टेडियममध्ये जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या आहेत. तर अश्विन 3 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. बुमराह ही मालिका खेळणार नाही. त्यामुळे अश्विननं आणखी 2 विकेट्स घेतल्यास तो सर्वात जास्त विकेट घेणारा बॉलर ठरू शकतो. (AFP)
शिखर धवननं रांचीमध्ये सर्वात जास्त 66 रन केले आहेत. तो या मैदानावर अर्धशतक झळकावणारा एकमेव बॅटर आहे. रोहित शर्मा 54 रनसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितनं जयपूरमधील सामन्यात 48 रन केले होते. त्यानं हाच फॉर्म कायम ठेवल्यास तो धवनला मागे टाकून नंबर 1 बनू शकतो. धोनीनं रांचीमध्ये फक्त 9 रन काढले आहेत. (AFP)
रांचीच्या मैदानात कॅप्टन म्हणून महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहलीनं (Virat Kohli) प्रत्येकी 1 टी20 मॅच जिंकली आहे. आता रोहित शर्माला त्यांची बरोबरी करण्याची संधी आहे. (BCCI/Twitter)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ही 6 वी टी20 सीरिज आहे. यापूर्वी टीम इंडियानं 3 तर न्यूझीलंडनं 2 सीरिज जिंकल्या आहेत. मागच्या वर्षी न्यूझीलंडमध्ये झालेली 5 मॅचची टी20 सीरिज टीम इंडियानं 5-0 नं जिंकली आहे. (AP)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजवर 18 टी20 सामने झाले आहेत. यापैकी दोन्ही टीमनं प्रत्येकी 9 सामने जिंकले आहेत. टीम इंडियानं रांचीमधील सामनाही जिंकल्यास न्यूझीलंड विरुद्ध 10 मॅच जिंकणारी पाचवी टीम होण्याचा मान त्यांना मिळेल. यापूर्वी इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी ही कामगिरी केली आहे. (AP)