मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /मोहम्मद अझहरुद्दीन पुन्हा बनला HCA चा कॅप्टन, 2 आठवड्यांपूर्वी झाली होती हकालपट्टी

मोहम्मद अझहरुद्दीन पुन्हा बनला HCA चा कॅप्टन, 2 आठवड्यांपूर्वी झाली होती हकालपट्टी

टीम इंडियाचा माजी कॅप्टन मोहम्मद अझहरुद्दीनला (Mohammad Azharuddin) दिलासा मिळाला आहे. त्याची हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या (HCA) अध्यक्षपदी पुन्हा नियुक्त करण्याचे आदेश लोकपाल दीपक वर्मा यांनी दिले आहेत.

टीम इंडियाचा माजी कॅप्टन मोहम्मद अझहरुद्दीनला (Mohammad Azharuddin) दिलासा मिळाला आहे. त्याची हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या (HCA) अध्यक्षपदी पुन्हा नियुक्त करण्याचे आदेश लोकपाल दीपक वर्मा यांनी दिले आहेत.

टीम इंडियाचा माजी कॅप्टन मोहम्मद अझहरुद्दीनला (Mohammad Azharuddin) दिलासा मिळाला आहे. त्याची हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या (HCA) अध्यक्षपदी पुन्हा नियुक्त करण्याचे आदेश लोकपाल दीपक वर्मा यांनी दिले आहेत.

हैदराबाद, 5 जुलै : टीम इंडियाचा माजी कॅप्टन मोहम्मद अझहरुद्दीनला (Mohammad Azharuddin) दिलासा मिळाला आहे. त्याची हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या (HCA) अध्यक्षपदी पुन्हा नियुक्त करण्याचे आदेश लोकपाल दीपक वर्मा यांनी दिले आहेत.अझरची हकालपट्टी करणाऱ्या पाच सदस्यीय कौन्सिलला लोकपालनं अपात्र घोषित केले आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या पाच वरिष्ठ सदस्यीय कौन्सिलनं अझरची हकालपट्टी केली होती. यामध्ये जॉन मनोज, आर. विजयानंद, नरेश शर्मा, सुरेंद्र अग्रवाल आणि अनुराधा यांचा समावेश होता. या सर्वांना तात्पुरते अपात्र ठरवण्यात आले आहे.

'या कौन्सिलनं अझरच्या विरोधातील तक्रार लोकपालकडे पाठवली नव्हती. त्यांना परस्पर या प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आपण हा आदेश रद्द करत आहोत. त्याचबरोबर अझरवर भविष्यात होणाऱ्या कोणत्याही कारवाईपासून दूर राहण्याचा आदेश या सर्व सदस्यांना दिला आहे,' असे लोकपाल वर्मा यांनी स्पष्ट केले आहे.

का केली होती हकालपट्टी?

अझहरुद्दीन  विरुद्ध सदस्यांनी केलेल्या तक्रारीनंतर त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. अझरवर नियमभंग करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अझहरुद्दीन दुबईतील एका क्रिकेट क्लबचा सदस्य आहे. हा क्लब बीसीसीआयनं मान्यता न दिलेल्या स्पर्धेत खेळतो. अझहरुद्दीननं याबाबतची माहिती असोसिएशनपासून लपवून ठेवल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.अझहरुद्दीन  27 सप्टेंबर 2019 रोजी एचसीएचा अध्यक्ष बनला. त्यानंतर त्याची कारकिर्द सतत वादग्रस्त ठरली आहे.

दिल्लीच्या बॅट्समननं T20 क्रिकेटमध्ये केलं द्विशतक! 17 फोर आणि 17 सिक्सचा वर्षाव

अझहरुद्दीनची क्रिकेट कारकिर्द

अझहरुद्दीननं भारताकडून 334 वन-डेमध्ये 36 पेक्षा  जास्त सरासरीनं 9378 रन काढले आहेत. यामध्ये 7 शतक आणि 58 अर्धशतकांचा समावेश आहे. तर त्याने टेस्टमध्ये 45.03 च्या सरासरीनं 6215 रन काढले आहेत.यामध्ये 22 शतक आणि 21 अर्धशतकं आहेत.

जगातील कलात्मक बॅट्समनमध्ये अझरची गणणा होते. तो भारताचा यशस्वी कॅप्टनही होता. क्रिकेट कारकिर्दीमधील पहिल्या तीन टेस्टमध्ये शतक करणारा तो जगातील एकमेव बॅट्समन आहे. त्याचबरोबर वन-डे क्रिकेटमध्ये 9000 रनचा टप्पा पार केलेला तो पहिला खेळाडू आहे.

मॅच फिक्सिंगचा आरोप

अझहरुद्दीनवर 2000 साली मॅच फिक्सिंगचा आरोप झाला होता. या प्रकरणात त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आला. 2012 मध्ये आंध्र प्रदेश हायकोर्टानं ती बंदी उठवली. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. अझहरुद्दीनची क्रिकेट कारकिर्द त्यापूर्वीच संपली होती

First published:

Tags: Cricket news, Hyderabad