Home /News /sport /

दिल्लीच्या बॅट्समननं T20 क्रिकेटमध्ये केलं द्विशतक! 17 फोर आणि 17 सिक्सचा वर्षाव

दिल्लीच्या बॅट्समननं T20 क्रिकेटमध्ये केलं द्विशतक! 17 फोर आणि 17 सिक्सचा वर्षाव

टी20 क्रिकेट या कमी बॉलच्या फास्ट क्रिकेटमध्ये शतक झळकावणे ही देखील दुर्मिळ गोष्ट मानली जाते. त्याचवेळी दिल्लीच्या क्रिकेटपटूनं थेट द्विशतक झळकावलं आहे. विशेष म्हणजे त्याने ही कामगिरी दुसऱ्यांदा केली आहे.

  मुंबई, 5 जुलै : टी20 क्रिकेट या कमी बॉलच्या फास्ट क्रिकेटमध्ये शतक झळकावणे ही देखील दुर्मिळ गोष्ट मानली जाते. त्याचवेळी दिल्लीचा क्रिकेटपटू सुबोध भाटीनं (Subodh Bhati, Delhi) द्विशतक झळकावलं आहे. विशेष म्हणजे ही ऐतिहासिक कामगिरी त्याने दुसऱ्यांदा केली आहे. दिल्लीतील एका क्लब मॅचमध्ये सुबोधनं 79 बॉलमध्ये 205 रन काढले. या खेळीत त्याने 17 फोर आणि 17 सिक्सचा वर्षाव केला. याचाच अर्थ त्याने फक्त 34 बॉलमध्ये 170 रन काढले. दिल्ली XI विरुद्ध सिंबा या लढतीत दिल्ली XI कडून खेळताना सुबोधनं हा पराक्रम केला. या खेळीमध्ये त्याचा स्ट्राईकरेट 259 इतका होता. सुबोधच्या द्विशतकामुळे त्याच्या टीमनं 20 ओव्हरमध्ये 2 आऊट 256 रन काढले. सुबोधशिवाय सचिन भाटीनं 25 रनचं योगदान दिले. सिंबाला 257 रनचं आव्हान पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम 199 रनवरच ऑल आऊट झाली. द्विशतक करणारा दुसरा बॅट्समन T20 क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा सुबोध हा दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी श्रीलंकेच्या धनुका पाथिरना याने ही कमाल केली होती. त्याने 2007 साली इंग्लंडमधील एका लीग मॅचमध्ये 72 बॉलमध्ये 277 रन केले होते. या खेळीत त्याने 29 सिक्स आणि 18 फोर लगावले होते.
  सुबोधनं देखील यापूर्वी 2018 साली द्विशतक झळकावले होते. त्यावेळी त्याने 21 सिक्स आणि 13 फोरच्या मदतीनं 57 बॉलमध्ये 207 रन काढले होते. टीम इंडियात इंग्लंडमध्ये जिंकण्याची क्षमता, चॅपलनी सांगितलं कारण सुबोधची कारकिर्द 30 वर्षांचा सुबोध मुळचा उत्तर प्रदेशचा आहे. पण, तो दिल्लीकडून क्रिकेट खेळतो. त्याने दिल्लीकडून आजवर 8 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 147 रन काढले असून 19 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 24 लिस्ट A मॅचमध्ये 132 रन आणि 37 विकेट्स घेतल्या आहेत. तर 39 टी20 मॅचमध्ये 120 रन आणि 47 विकेट्स घेतल्या आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cricket, Delhi

  पुढील बातम्या