मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

उनमुक्त चंदनंतर आणखी एका दिग्गज खेळाडूने देश सोडला, अमेरिकेतून खेळणार क्रिकेट

उनमुक्त चंदनंतर आणखी एका दिग्गज खेळाडूने देश सोडला, अमेरिकेतून खेळणार क्रिकेट

राष्ट्रीय टीमकडून संधी मिळत नसल्यामुळे गेल्या काही काळात अनेक क्रिकेटपटूंनी देश सोडून अमेरिका गाठलं. टीम इंडियाला अंडर-19 वर्ल्ड कप जिंकवून देणारा उनमुक्त चंद (Unmukt Chand) यातलाच एक. यानंतर आता पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू उमर अकमल (Umar Akmal) यानेही अमेरिकेत लीग क्रिकेट खेळण्यासाठी देश सोडला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 5 ऑक्टोबर : राष्ट्रीय टीमकडून संधी मिळत नसल्यामुळे गेल्या काही काळात अनेक क्रिकेटपटूंनी देश सोडून अमेरिका गाठलं. टीम इंडियाला अंडर-19 वर्ल्ड कप जिंकवून देणारा उनमुक्त चंद (Unmukt Chand) यातलाच एक. यानंतर आता पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू उमर अकमल (Umar Akmal) यानेही अमेरिकेत लीग क्रिकेट खेळण्यासाठी देश सोडला आहे. पाकिस्तानमधली उमर अकमलची कारकिर्द कायमच वादग्रस्त राहिली. भ्रष्टाचार विरोधी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) त्याच्यावर बंदीही घातली. एवढच नाही तर त्याच्यावर मॅच फिक्सिंग आणि टीममध्ये गैरवर्तन केल्याचे आरोपही लावण्यात आले. पीसीबीचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी अकमलला मानसिक रुग्ण म्हणून संबोधलं, तसंच त्याला डॉक्टरांकडून उपचार घ्यायचाही सल्ला दिला.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार 31 वर्षांचा उमर अकमलने नॉर्दन क्रिकेट कॅलिफोर्निया असोसिएशनसोबत काही काळासाठी करार केला आहे, पण यामध्ये त्याने भविष्यात हा करार वाढवण्याचा पर्याय खुला ठेवला आहे, ज्यामुळे त्याचे पाकिस्तान क्रिकेटसोबतचे संबंध समाप्त होतील. उमर अकमल प्रीमियर सी लीगच्या या मोसमात कॅलिफोर्निया जाल्मी टीमचं प्रतिनिधीत्व करेल.

अकमलने पीसीबी क्रिकेट असोसिएशनच्या टी-20 स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. यामध्ये तो सेंट्रल पंजाब सेकंड इलेव्हन कडून खेळला. या स्पर्धेत त्याने 0, 14, 7, 16 आणि 29 रनची खेळी केली. यानंतर त्याने कॅलिफोर्नियाला जायचा निर्णय घेतला. कायदे आझम ट्रॉफी 20 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, या स्पर्धेत अकमल खेळणार का नाही, याबाबत अजून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार अकमलचं क्रिकेट समुदायाने स्वागत केलं नव्हतं, त्यामुळे त्याची पाकिस्तानच्या नॅशनल टी-20 कपसाठी निवड करण्यात आली नव्हती. उमर अकमल पाकिस्तानकडून 16 टेस्ट, 121 वनडे आणि 84 टी-20 खेळला. त्याने टेस्टमध्ये 35.82 च्या सरासरीने 1003 रन, वनडेमध्ये 34.34 च्या सरासरीने 3,194 रन आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मध्ये 26 च्या सरासरीने 1,690 रन केले होते.

पाकिस्तान सुपर लीगच्या पाचव्या मोसमात संशयास्पद हालचालींमध्ये उमर अकमल दोषी आढळला, यानंतर त्याचं निलंबन करण्यात आलं. मॅच फिक्सिंगची ऑफर आल्यानंतर त्याने याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी संपर्क साधला नाही, त्यामुळे त्याचं 18 महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं.

First published:

Tags: Pakistan Cricket Board