मुंबई, 2 डिसेंबर : कोरोना व्हायरसचं सावट कायम असलं तरी देशांतर्गत क्रिकेट पुन्हा सुरू झाले आहे. विजय हजारे करंडक (Vijay Hazare Trophy) स्पर्धा काही दिवसांपूर्वी संपली. या महिन्यात रणजी क्रिकेट (Ranji Trophy) स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेतून नवे स्टार्स उदयाला येतील. त्याचवेळी देशभर वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी देखील स्पर्धा सुरू आहेत. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या (Madhya Pradesh Cricket Association) 14 वर्षांच्या आतील मुलांसाठी ए.व्ही. कानमाडीकर (AV Kanmadikar) ट्रॉफी सुरू आहे. या स्पर्धेत नव्या स्टारचा उदय झाला आहे. या स्पर्धेत यशवर्धन चौहान (Yashwardhan Chouhan) हा 13 वर्षांचा मुलगा नवा स्टार म्हणून उदयाला आला आहे. यशने आत्तापर्यंत 4 मॅचमध्येच 1074 रन काढले आहेत. 25 नोव्हेंबर 2008 रोजी ग्वाहलेरमध्ये जन्मलेला यशवर्धन या स्पर्धेत युथ क्लब मोरनाकडून खेळत आहे. त्याने पहिल्या चार मॅचमध्ये 47, 425, 235 आणि नाबाद 367 रन काढले आहेत. यशवर्धननं 1074 रन 197 फोरच्या मदतीनं पूर्ण केले आहेत. पण, त्याने यात एकही सिक्स लगावलेला नाही. त्यावरून जमिनीवरूनच बॉल मारण्याची आणि कोणताही धोका न घेण्याची त्याच्या खेळाची पद्धत दिसून येते. त्याच्या या तंत्रशुद्ध खेळानं अनेक जाणकार प्रभावित झाले आहेत. यश ऑफ स्पिन बॉलिंग देखील करतो. त्याने या स्पर्धेत 7 विकेट्स देखील घेतल्या आहेत. गाबा टेस्टपूर्वी रडत होती अश्विनची पत्नी, बॉलरनं सांगितली ‘ती’ भावुक आठवण ए.व्ही. कानमाडीकर करंडक ही मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनची मान्यता असलेली स्पर्धा आहे. शालेय गटातील क्रिकेटपटू याच स्पर्धेत घडतात. त्यांची वरच्या वयोगटातील टीममध्ये याच स्पर्धेतून निवड होते. या स्पर्धेच्या साखळी फेरीतील प्रत्येक सामना हा दोन दिवसांचा असतो. तर सेमी फायनलपासूनचे सामने हे तीन दिवस खेळवले जातात. शालेय क्रिकेटपटूंचा कस लागणाऱ्या कानमाडीकर करंडक स्पर्धेत यशवर्धननं रनमशिन सारखे रन करत नवा स्टार उदयाला येत असल्याचे जाहीर केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.