जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / गाबा टेस्टपूर्वी रडत होती अश्विनची पत्नी, बॉलरनं सांगितली 'ती' भावुक आठवण

गाबा टेस्टपूर्वी रडत होती अश्विनची पत्नी, बॉलरनं सांगितली 'ती' भावुक आठवण

गाबा टेस्टपूर्वी रडत होती अश्विनची पत्नी, बॉलरनं सांगितली 'ती' भावुक आठवण

टीम इंडियाने (Team India) गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा (Australia) गाबा टेस्टमध्ये पराभव करत इतिहास घडवला होता. त्या मॅचच्या दरम्यान मैदानाच्या बाहेर काय घडले हे सर्वांना माहिती नाही. टीम इंडियाचा आर. अश्विननं (R. Ashwin) याचा खुलासा केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 डिसेंबर : टीम इंडियाने (Team India) गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा (Australia) गाबा टेस्टमध्ये पराभव करत इतिहास घडवला होता. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, आर. अश्निन या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडियानं गाबा टेस्ट जिंकण्याचा पराक्रम केला. 32 वर्षानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा या मैदानात पराभव झाला होता. भारताने मैदानात केलेली कामगिरी तर सर्वांना माहिती आहे. पण, मैदानाच्या बाहेर काय घडले हे सर्वांना माहिती नाही. टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्विननं (R. Ashwin) एका कार्यक्रमात याचा खुलासा केला आहे. आर. अश्विननं बोरिया मुजुमदार यांच्या ‘बॅक स्टेज विथ बोरिया’ कार्यक्रमात गाबा टेस्टची आठवण सांगितली आहे. गाबा टेस्टच्या पूर्वी अश्विनची पत्नी प्रीती धाय मोकलून रडली होती. अश्विननं ती भावुक आठवण सांगितली आहे. ‘हा सर्व प्रवास किती अवघड आहे, हे माझ्या पत्नीला चांगलेच माहिती होते. तिला गेल्या 10 वर्षांपासून याचा अनुभव आहे. आम्ही ब्रिस्बेनमध्ये पोहचलो तेव्हा आम्हाला हॉटेलच्या एका खोलीत बंद करण्यात आले होते. आम्हाला कुठेही बाहेर जाण्याची परवानी नव्हती. मला दहा मिनिटानंतर रडण्याचा आवाज ऐकू आला. तो माझ्या मुलींचा आवाज नव्हता. मी आतमध्ये जाऊन पाहिलं तर माझी पत्नी रडत होती. तिला भावनांवर नियंत्रण ठेवणे अवघड जात होते. मी तिला रडण्याचे कारण विचारले त्यावेळी मला काय होत आहे, हे समजत नाही, असं तिनं सांगितलं. मी हॉटेलच्या रूममध्ये आणखी जास्त काळ राहू शकत नाही. तू प्रॅक्टीससाठी बाहेर जातोस. तुला मोकळ्या हवेत श्वास घेता येतो. पण, मला या रूममध्येच राहावे लागते, हे अमानवी आहे. मी हे जास्त सहन करू शकत नाही.’ असे ती म्हणाली, अशी भावुक आठवण अश्विननं सांगितली. IND vs SA : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियानं गाळला घाम, आफ्रिकेत घडणार इतिहास! अश्विननं या मुलाखतीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूंना कोणत्या गोष्टींचा त्याग करावा लागतो हे सांगितले. ‘क्रिकेटपटू पैसा कमावत आहेत, यात कोणतीही शंका नाही. पण, या खेळासाठी त्यांना मोठा त्याग करावा लागतो. मी या खेळामुळे अनेक कौटुंबिक जबाबदारी सोडून दिली आहे. मी एकुलता एक मुलगा आहे. पण, मी गेल्या 27 वर्षांमध्ये दिवाळी किंवा संक्रात घरी साजरी केली नाही. माझे आई-वडिल मागच्या वर्षी सहा महिने कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये होते. मी त्यांना गेल्या सात महिन्यांपासून पाहिलेलं नाही. भारतामध्ये सर्वांनाच क्रिकेटचं वेड आहे. यापेक्षा मोठी भावना काही नाही, हे सर्व खरं आहे. पण, क्रिकेटपटूंबद्दल सहानुभूती दाखवली तरी पुरेसं आहे. असे अश्विन यावेळी म्हणाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात