मुंबई, 3 जून : टिंडर (Tinder) या डेटींग अॅपच्या माध्यमातून जगभरातील लोकं त्यांचा पार्टनर निवडतात. या अॅपचा वापर नवे क्रिकेटपटू शोधण्यासाठी केला जातोय हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. इंग्लंडमध्ये हा प्रकार सुरू आहे. सरेमधील एंगलफील्ड ग्रीन क्रिकेट क्लबनं (Englefield Green Cricket Club) नवोदीत क्रिकेटपटूंना शोधण्यासाठी टिंडर अकाऊंट उघडलंय. या क्लबनं 36 वर्षांची महिला असल्याचं भासवत हे अकाऊंट उघडलं आहे. या अकाऊंटचे प्रोफाईल पिक्चर देखील मजेशीर आहे. त्यामध्ये बाऊंड्री जवळ एक बियरचा ग्लास ठेवला असून त्याच्या बॅकग्राऊंडला क्रिकेटची मॅच सुरू आहे. एंगफिल्ड क्रिकेट क्लबनं टिंडर अकाऊंटवर फोटोसह पोस्ट शेअर केलीय. ‘36 वर्षांच्या जॉर्ज एंगफिल्ड क्रिकेट क्लबला नव्या क्रिकेटपटूंच्या शोधात आहे.’ अशी ही पोस्ट असून त्यांनी ईमेल आयडी आणि ट्विटर अकाऊंटचा माहिती शेअर केली आहे. नव्या खेळाडूंचा शोध घेण्यासाठी क्रिकेट क्लबनं केलेल्या या उपायची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. @ThatsSoVillage या ट्विटर पेजवरून याबाबत मजेशीर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. तर, ‘एंगफिल्ड क्रिकेट क्लबचा नव्या खेळाडूंना शोधण्यासाठी जबरदस्त उपाय, नव्या खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी या क्लबनं टिंडरवर स्वत:ला 36 वर्षांची महिला असल्याचं दाखवलं आहे.’ अशी प्रतिक्रिया एका युझरनं दिली आहे. अश्विननं सांगितली सिडनी टेस्टची Inside Story, वाचून कराल लढवय्या वृत्तीला सलाम 36 व्या वर्षी तुमची टीममध्ये 30+ वयाच्या पुरूषांचा प्रामुख्यानं समावेश असेल, अशी प्रतिक्रिया अन्य एका युझरनं दिली आहे. एखादा व्यवसाय किंवा संस्थेच्या विस्तारासाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाचा वापर करणे आता नवे राहिले नाही. इंग्लंडच्या क्रिकेट क्लबनं यासाठी आता टिंडरचा वापर सुरू केलाय. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात या पद्धतीचे आणखी उपक्रम टिंडरवर राबवले जातील अशी भावना युझर्स व्यक्त करत आहेत.