इंदूर, 16 नोव्हेंबर: बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि 130 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने पहिल्या डावात 343 धावांची विजयी अशी आघाडी घेतली होती. या डोंगरा ऐवढ्या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव 213 धावात संपुष्ठात आला. तिसऱ्या दिवशी सकाळी भारताने पहिला डाव घोषित केला. त्यानंतर 343 धावांचा डोंगर घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशचा दुसरा डाव देखील कोसळला. पहिल्या डावा प्रमाणे दुसऱ्या डावात देखील मुस्ताफिझूर रेहमान (64) वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. या विजयासह भारताने कसोटीमध्ये घरच्या मैदानावर सलग 13व्या विजयाची नोंद केली आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर आर.अश्विनने ३, उमेश यादव याने 2 आणि इशांत शर्माने १ विकेट घेतली. पहिल्या डावात द्विशतकी खेळी करणाऱ्या मयांक अग्रवाल याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. दोन्ही संघांमधील दुसरा कसोटी सामना कोलकाता येथे होणार आहे. हा भारतातील पहिला डे-नाईट कसोटी सामना असणार आहे. अपडेट- भारताचा 1 डाव आणि 130 धावांनी विजय बांगलादेशचा दुसरा डाव 213 धावांवर संपुष्ठात भारत विजयापासून दोन विकेट दूर, शमीने घेतली 8वी विकेट 59 षटकात बांगलादेशच्या 200 धावा बांगलादेशची सातवी विकेट; उमेश यादवने घेतली सैफ हसनची विकेट भारताला आणखी एक यश; अश्विनने घेतली लिटन कुमार दासची विकेट, बांगलादेश 6 बाद 135 महमुदुल्ला रियाद 15 धावांवर बाद, बांगलादेश 5 बाद 72 बांगालादेशची चौथी विकेट, शमीने मोहम्मद मिथुनला केले बाद शमीने घेतली कर्णधार मोमिनूल हकची विकेट बांगलादेश 2 बाद 12 शदमान इस्लाम 6 धावा करून बाद, इशांत शर्माने घेतली विकेट बांगलादेशला पहिला धक्का, उमेश यादवने घेतली इम्रूल कायेसची विकेट बांगलादेशच्या दुसऱ्या डावाला सुरुवात भारताचा पहिला डाव 6 बाद 493 घोषित कसोटीत 17 चेंडूत 55 धावा; या भारतीय गोलंदाजाने विराट,रोहितला टाकले मागे पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारतानं 343 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. पहिल्या दिवशी 86 धावांवर खेळायला सुरुवात केलेल्या भारतीय संघानं दुसऱ्या दिवसाअखेरीस 343 धावांची आघाडी मिळवली आहे. यात मयंक अग्रवालची शानदार खेळी चर्चेचा विषय ठरली. मयंक अग्रवालनं एकहाती भारताला मजबूत स्थितीत पोहचवले. मयंक अग्रवालची द्विशतकी खेळी आणि जडेजाचे अर्धशतक यांच्यामुळं भारतानं 493 धावापर्यंत मजल मारली. भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 9 कसोटी सामने झाले आहेत त्यापैकी 7 सामन्यात भारताने विजय मिळवाल असून दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या या मालिकेत विजय मिळवून सलग 12वी कसोटी मालिका जिंकण्याचा कोहली आणि संघाचा प्रयत्न असेल. या सामन्यात विराट कोहलीला कर्णधार म्हणून 5 हजार धावा करण्यासाठी 32 धावांची गरज आहे. तर कर्णधार म्हणून सर्वधिक शतक स्वत:च्या नावावर करण्यासाठी त्याला आणखी एका शतकाची गरज आहे. सध्या हा विक्रम कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग या दोघांच्या नावावर आहे. या दोघांनी कर्णधारपदावर असताना प्रत्येकी 19 शतके केली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.