इंदूर, 16 नोव्हेंबर: एखादा गोलंदाज फलंदाजापेक्षा तुफान बॅटिंग केली असे तर तुम्हाला कोणी विचारले तर त्याचे उत्तर तुम्ही नाहीच असेल द्याल. पण भारतीय संघात असा एक गोलंदाज आहे ज्यांना त्याच्या फलंदाजीच्या जोरावर चक्क हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma)आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या दिग्गज फलंदाजांना मागे टाकले आहे. इंदूरमध्ये सध्या बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट आणि रोहित पेक्षा आक्रमक फलंदाजी करणारा एक गोलंदाज चर्चेत आला आहे.
भारतीय संघातील जलदगती गोलंदाज उमेश यादव याने त्याच्या कसोटीमधील गेल्या 17 चेंडूत 55 धावा केल्या आहेत. इंदूर कसोटीत जेव्हा उमेश फलंदाजासाठी आला तेव्हा त्याने टी-20 सामन्यासारखी फलंदाजी केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा उमेशने 10 चेंडूत 25 धावा केल्या होत्या. त्यात 3 षटकार आणि 1 चौकारांचा समावेश होता. जर कसोटी क्रिकेटमधील उमेशच्या अखेरच्या 17 चेंडूंचा विचार केल्यास त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यापेक्षा अधिक तुफानी फलंदाजी केल्याचे दिसून येते. गेल्या 17 चेंडूत उमेशने 6,6,0,1,6,0,6,0,6,0,0,6,2,0,4,6,6 अशा 55 धावा केल्या आहेत. याउलट विराट कोहलीने कसोटी क्रिकेटच्या अखेरच्या 17 चेंडूत out,0,0,1,0,1,0,0,2,0,4,0,0,4,0,0,out यासह 12 धावा केल्या आहेत. हिटमॅन अशी ओळख असलेल्या रोहित शर्मा याने out, 0,0,0,0,0,4,0,0,0,0,0,0,2,out,1,0 अशा मिळून केवळ 7 धावा केल्या आहेत.
अर्थात उमेश यादव याची रोहित आणि विराट यांच्याशी मोठ्या खेळीबाबत तुलना होऊ शकत नाही. कोहलीने आफ्रिकेविरुद्ध 254 धावांची तर रोहितने 212 धावांची खेळी केली होती. हे दोन्ही फलंदाज मोठ्या खेळीसाठी ओळखले जातात. पण उमेश यादव याने गोलंदाजीसोबतच फलंदाजीत कमालची कामगिरी केल्यामुळे भारतीय संघाच्या तळातील फलंदाजीमध्ये सुधारणा झाली आहे. आघाडी आणि मधळ्या फळी प्रमाणे तळातील फलंदाजी मजबूत झाली आहे. उमेशने आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात 10 चेंडूत 31 धावा करत खळबळ उडवली होती. उमेशने छोट्यापण षटकार आणि चौकारांच्या मदतीने आक्रमक धावा केल्या आहेत.
गोलंदाजीत केली ही शानदार कामगिरी
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने 493 धावा केल्या. रविंद्र जडेजा 60 तर उमेश यादव 25 धावांवर खेळत होते. भारताकडून मयांक अग्रवाल याने 243 धावा केल्या होत्या. त्याआधी भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्या समोर पाहुण्या संघाला 150 धावा करता आल्या. यात मोहम्मद शमीने 3 विकेट तर इशांत शर्मा, आर.अश्विन आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या. आता या गोलंदाजांना दुसऱ्या डावात देखील अशीच कमाल करावी लागणार आहे. यात उमेश यादवच्या गोलंदाजीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा