Home /News /sport /

इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता क्रिकेटपटू देश सोडणार, भारतीय खेळाडूंसोबत सुरू करणार करिअर

इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता क्रिकेटपटू देश सोडणार, भारतीय खेळाडूंसोबत सुरू करणार करिअर

इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचा ऑलराऊंडर लियाम प्लंकेट (Liam Plunkett) त्याचा देश सोडणार आहे. तो आता भारतीय खेळाडूंसोबत एका नव्या टीममध्ये करिअरची सुरूवात करेल.

    मुंबई, 1 सप्टेंबर : इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचा ऑलराऊंडर लियाम प्लंकेट (Liam Plunkett) त्याचा देश सोडणार आहे. तो आता भारतीय खेळाडूंसोबत एका नव्या टीममध्ये करिअरची सुरूवात करेल. इंग्लंड क्रिकेटचा हा सिझन संपताच तो देशाला अलविदा करणार आहे. त्यानंतर तो मेजर क्रिकेट लीग स्पर्धेत (Major Cricket League) खेळण्यासाठी अमेरिकेत जाणार आहे. या लीगमध्ये उन्मुक्त चंदसह (Unmukt Chand) अनेक भारतीय खेळाडू आहेत. प्लंकेटची पत्नी इमेलेहा देखील अमेरिकन आहे. प्लंकेटनं एकूण 124 मॅचमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं आणि 201 विकेट्स घेतल्या. तो 2018 साली यॉर्कशर टीममधून सरे या कौंटी टीमकडं गेला होता. सरेसोबत तो गेल्या 3 वर्षांपासून आहे. गेल्या 3 वर्षांपासून पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे प्लंकेटनं आभार मानले आहेत. मी इंग्लंडकडून खेळाचा पूर्ण आनंद घेतला. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर मी अमेरिकेत खेळ आणि कोचिंग या दोन्ही गोष्टीला चालना देण्यासाठी मदत करणार आहे, याचा मला आनंद आहे.' असं त्यानं स्पष्ट केलं. कोचीही जबाबदारी प्लंकेट 'द फिलोडेल्फियन्स' या टीमच्या कोचची जबाबदारीही सांभाळणार आहे. ही टीम अमेरिकेतील मायनर क्रिकेट लीगचा भाग आहे. प्लंकेट अमेरिकेला जाणार असला तरी तो इंग्लंडमधील स्थानिक क्रिकेटपटू म्हणून पुढील वर्षी होणाऱ्या टी20 ब्लास्ट आणि द हंड्रेड या स्पर्धेत खेळण्यासाठी पात्र असेल. 'द वेल्श फायर' या द हंड्रेडमधील टीमचा तो या सिझनमध्ये सदस्य होता. IPL 2021: राजस्थान रॉयल्सला धक्का, 2 दिग्गज आऊट! रोहितच्या जुन्या सहकाऱ्याचा टीममध्ये समावेश दरम्यान, आपला अमेरिकेच्या राष्ट्रीय टीमकडून खेळण्याचा कोणताही विचार नसल्याचं प्लंकेटनं एका ब्रिटीश वृत्तपत्राला दिलेल्या मुखातीमध्ये सांगितलं आहे. मी सध्या 36 वर्षांचा आहे. अमेरिकेकड़ून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी पात्र होईपर्यंत 39 किंवा 40 चा होईल, याची जाणीव त्यानं करुन दिली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, England

    पुढील बातम्या