मुंबई, 1 सप्टेंबर : राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) आयपीएल 2021 (IPL 2021) च्या पहिल्या टप्प्यात फार कमाल करता आली नव्हती. आता युएईमध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यापूर्वीही या टीमला दोन मोठे धक्के बसले आहेत. विकेट किपर बॅट्समन जोस बटलर (Jos Buttler) आणि ऑल राऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) उर्वरित आयपीएल सिझनमधून आऊट झाले आहेत. बटलर आणि स्टोक्स हे राजस्थानचे महत्त्वाचे खेळाडू आहेत. ते उर्वरित स्पर्धेत न खेळल्याचा मोठा फटका टीमला बसणार आहे. राजस्थाननं आता त्यांच्या पर्यायाची निवड केली आहे. इंग्लंडच्या या खेळाडूंनी वेगवेगळ्या कारणांमुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. बटलरला दुसऱ्यांदा मूल होणार आहे. त्यामुळे त्यानं कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर बेन स्टोक्स सध्या मानसिक कारणांमुळे क्रिकेटपासून दूर आहे. स्टोक्सनं क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात स्टोक्सला दुखापत झाली होती. त्यावेळीही तो स्पर्धेतून बाहेर पडला होता. राजस्थाननं बटलरच्या जागी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) माजी ओपनर एव्हिन लुईस (Evin Lewis) ची निवड केलीय. तर बेन स्टोक्सच्या जागी ओशले थॉमसचा (Oshane Thomas) समावेश केलाय. थॉमस यापूर्वीही राजस्थानकडून खेळला आहे. त्याला 2020 च्या आयपीएलनंतर रिलीज करण्यात आले होते.
That's #DeadlineDay done! 🤩
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) August 31, 2021
OT joins the Royals in the UAE as a replacement for Ben Stokes.
आणखी एक खेळाडू जखमी राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंना मागे लागलेलं दुखापतीचं सत्र काही संपलेलं नाही. राजस्थानचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) दुखापतीमुळे आयपीएल खेळणार नाही. त्यातच सध्या फॉर्मात असलेला इंग्लंडचा बॅट्समन लियम लिविंगस्टोन देखील सध्या दुखापतग्रस्त आहे. लिविंगस्टोनला सोमवारी कांऊटी क्रिकेट खेळताना दुखापत झाली आहे. त्यामुळे राजस्थानचं टेन्शन आणखी वाढलंय. सौरव गांगुलीच्या आईला कोरोनाची लागण, दादाच्या कोरोना टेस्टबद्दल महत्त्वाची अपडेट संजू सॅमसनच्या (Sanju Samson) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सनं या आयपीएलमध्ये सात पैकी तीन सामने जिंकले असून ते सध्या पाँईट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत.