Home /News /sport /

IPL 2022: आयपीएल मेगा ऑक्शनसाठी BCCI करणार आंतरराष्ट्रीय मालिकेत बदल

IPL 2022: आयपीएल मेगा ऑक्शनसाठी BCCI करणार आंतरराष्ट्रीय मालिकेत बदल

आयपीएल 2022 (IPL 2022) साठी होणाऱ्या मेगा ऑक्शनची तयारी सुरू झाली आहे. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरूमध्ये हा लिलाव (IPL 2022 Mega Auction) होणार आहे. या लिलावासाठी आंतरराष्ट्रीय मालिकेत बदल होणार आहे.

    मुंबई, 21 जानेवारी : आयपीएल 2022  (IPL 2022) साठी होणाऱ्या मेगा ऑक्शनची तयारी सुरू झाली आहे. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरूमध्ये हा लिलाव (IPL 2022 Mega Auction) होणार आहे. यंदा आयपीएलमध्ये 8 नाही तर 10 टीम खेळणार आहेत. सर्व टीमनी मिळून ऑक्शनपूर्वीच 33 खेळाडूंना करारबद्ध केले आहे. भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies ) यांच्यातील तिसरी वन-डे 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे. आयपीएल लिलावाच्या पार्श्वभूमीवर या मॅचची तारीख बदलली जाऊ शकते. बीसीसीआय या विषयावर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाशी चर्चा करत आहे. हे सर्व सामने अहमदाबाद आणि कोलकाता या दोन शहरांमध्येच घेण्यात यावे अशी शिफारस बीसीसीआयच्या टूर्स अँड फिक्सचर समितीनं केली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार अहमदाबादसह जयपूर, कोलकाता, कटक, विशाखापट्टणम आणि तिरुअनंतपुरममध्ये या मालिकेतील सामने होणार आहेत. 6 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान ही मालिका होणार आहे. पण, देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता अहमदाबाद आणि कोलकाता या दोन शहरांमध्ये सर्व सामने घेण्याचा निर्णय लवकरच जाहीर होऊ शकतो. श्रीलंका सीरिजमध्येही बदल श्रीलंकेची टीम फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दोन्ही टीममध्ये (India vs Sri Lanka) 3 टेस्ट आणि 3 टी20 सामने होणार आहेत. यामधील टेस्ट सीरिज ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. हे सामने नियोजित वेळापत्रकानुसार बंगळुरू आणि मोहालीमध्ये होतील. तर टी20 सामने धर्मशालामध्ये होण्याची शक्यता आहे. यापूर्वी हे सामने मोहाली आणि लखनऊमध्ये होणार होते. वन-डे नंतर टेस्ट टीमच्या कॅप्टन पदावरूनही होणार होती विराटची हकालपट्टी! विराट कोहलीनं राजीनामा दिल्यानंतर श्रीलंका विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाच्या टेस्ट टीमला नवा कॅप्टन मिळणार आहे. यामुळे या सीरिजची सर्वांना उत्सुकता आहे. विराट कोहलीचा उत्तराधिकारी म्हणून रोहित शर्माचं नाव सर्वात आघाडीवर आहे. त्याचबरोबर केएल राहुल आणि ऋषभ पंत ही नावं देखील सध्या चर्चेत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BCCI, Ipl 2022, Ipl 2022 auction

    पुढील बातम्या