मुंबई, 19 जानेवारी : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2022 हे खळबळजनक वर्ष म्हणून सुरू झाले आहे. या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात बांगलादेशनं न्यूझीलंड विरुद्धची (Bangladesh vs New Zealand) टेस्ट मॅच जिंकत इतिहास रचला. त्यानंतर आयर्लंडनं वेस्ट इंडिज विरुद्धची (Ireland vs West Indies) वन-डे मालिका जिंकली. आता त्यापाठोपाठ झिम्बाब्वेनं श्रीलंकेला (Zimbabwe vs Sri Lanka) त्यांच्याच देशात पराभूत केले आहे.
पल्लेकेलेमध्ये झालेल्या दुसऱ्या वन-डेमध्ये श्रीलंकेनं 22 रननं विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. झिम्बाब्वेनं पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 9 आऊट 302 रन केले होते. कॅप्टन क्रेग आयर्व्हिननं सर्वात जास्त 91 रन काढले. सीन विल्यमसनं 48 रनची खेळी केली.
शनाकाचे शतक व्यर्थ
303 रनचा पाठलाग करताना श्रीलंकेची अवस्था 4 आऊट 63 अशी बिकट झाली होती. त्यावेळी श्रीलंकेचा कॅप्टन दासून शनाका (Dasun Shanaka) याने एकाकी संघर्ष करत यजमान टीमच्या आशा जागवल्या. शनाकानं 94 बॉलमध्ये 7 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं 102 रन काढले. शनाका आऊट झाल्यानंतर झिम्बाब्वेनं मॅचवर पकड मिळवत 22 रनने विजय मिळवला.
Zimbabwe seal a 22-run victory in the 2nd ODI.
The series is level at 1-1 ⚖️ 📝 Scorecard: https://t.co/U7aJg5FLQX#SLvZIM pic.twitter.com/3oo8w4ULvt — Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) January 18, 2022
झिम्बाब्वेचा श्रीलंकेविरुद्धचा हा 12 वा विजय आहे. त्यांनी 45 वन-डे सामन्यात श्रीलंकेविरुद्ध पराभव स्विकारला आहे. श्रीलंकेतील त्यांचा हा चौथाच विजय असून तब्बल 4 वर्षांनी झिम्बाब्वेनं लंकेला पराभूत करण्याची कामगिरी केली आहे.
U19 World Cup : Baby डीव्हिलियर्सचा धडाका, सलग तिसऱ्या मॅचमध्ये दमदार खेळी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Sri lanka, Zimbabwe