Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'बुमराहला इंग्लंडच्या खेळाडूंनी दिलेली शिवी जाहीर सांगू शकत नाही,' शार्दुल ठाकूरचा खुलासा

'बुमराहला इंग्लंडच्या खेळाडूंनी दिलेली शिवी जाहीर सांगू शकत नाही,' शार्दुल ठाकूरचा खुलासा

लॉर्ड्स टेस्टमध्ये जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि जेम्स अँडरसन (James Anderson) यांच्यात जोरदार वाद झाला. या दोघांमध्ये नेमकं काय झालं याचा खुलासा टीम इंडियाचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यानं केला आहे

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 16 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील नुकतीच संपलेली टेस्ट सीरिज (India vs England Test Series) बॅट आणि बॉल प्रमाणेच शाब्दिक चकमकींनीही गाजली. दोन्ही टीमच्या खेळाडूंनी एकमेकांविरुद्ध स्लेजिंग करण्याची एकही संधी सोडली नाही. विशेषत: लॉर्ड्स टेस्टमध्ये ही चकमक चांगलीच शिगेला पोहचली होती. या मॅचमध्ये जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि जेम्स अँडरसन (James Anderson) यांच्यात जोरदार वाद झाला. या दोघांमध्ये नेमकं काय झालं याचा खुलासा टीम इंडियाचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यानं केला आहे.

शार्दुल ठाकूरनं 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना सांगितलं की, 'लॉर्ड्स टेस्टमध्ये जे काही घडलं त्याचे पडसाद ओव्हलवरही उमटले. अँडरसन बुमराहला जे बोलला ते त्यानं बोलायला नको होतं. त्यांनी (इंग्लंड टीम) बुमराहला शिवीगाळ केली. त्याबद्दल सार्वजनिक सांगितलं जाऊ शकत नाही. त्यामुळे भारतीय खेळाडू आक्रमक झाले आणि त्यांनी इंग्लंडला त्यांच्याच शैलीमध्ये उत्तर दिलं.

लॉर्ड्स टेस्टमध्ये बुमराहनं टाकलेल्या बाऊन्सरनं अँडरसन त्रस्त झाला होता. त्यानंतर बुमराह बॅटींगला आला तेव्हा इंग्लंडच्या फास्ट बॉलर्सनी शॉर्ट पिच बॉल टाकत त्याला लक्ष्य केलं. पण बुमराहनं मोहम्मद शमीच्या जोडीनं त्यांचा धैर्यानं सामना केला. त्या दोघांनी केलेली पार्टनरशिप टीम इंडियाच्या विजयात निर्णायक ठरली.

IPL 2021: यूएईमध्ये घडणार नवा इतिहास, मलिंगाचा रेकॉर्ड मोडण्यासाठी भारतीय स्पिनर सज्ज

'आम्ही बॉडीलाईन बॉलिंग करू शकत नाही का?'

शार्दुल यावेळी बोलताना पुढे म्हणाला की, 'आम्ही विदेशात जातो तेव्हा आमच्या लोअर ऑर्डच्या बॅट्समनना बाऊन्सरचा सामना करावा लागतो. ऑस्ट्रेलियामध्ये नटराजनला मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी बाऊन्सर टाकले होते. त्यानं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्येही जास्त बॅटींग केलेली नाही, हे त्यांना माहिती आहे. तर आम्ही देखील विरोधी टीमच्या बॅट्समनना बाऊन्सर का टाकू शकत नाही? आम्ही बॉडीलाईन बॉलिंग का करायची नाही? आम्ही कुणाला खूश करण्यासाठी खेळत नाही. आम्ही विदेशात जिंकण्यासाठी खेळतो.'

First published:

Tags: Cricket news, James anderson, Jasprit bumrah, Shardul Thakur