• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: यूएईमध्ये घडणार नवा इतिहास, मलिंगाचा रेकॉर्ड मोडण्यासाठी भारतीय स्पिनर सज्ज

IPL 2021: यूएईमध्ये घडणार नवा इतिहास, मलिंगाचा रेकॉर्ड मोडण्यासाठी भारतीय स्पिनर सज्ज

आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा (IPL 2021, 2nd Phase) 19 तारखेपासून यूएईमध्ये सुरू होणार आहे. या आयपीएलमध्ये मलिंगाचा (Lasith Malinga) सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड तुटण्याची चिन्हं आहेत.

 • Share this:
  मुंबई, 16 स्पटेंबर: आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा (IPL 2021, 2nd Phase) 19 तारखेपासून यूएईमध्ये सुरू होणार आहे. या स्पर्धेचं विजेतेपद कोण पटकावणार हे समजण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पण, आयपीएलचा इतिहास पाहिला तर ज्या टीमचे स्पिन बॉलर्स चांगले आहेत, त्यांना विजेतेपद जिंकण्याची संधी जास्त आहे. याचं कारण म्हणजे आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या टॉप 10 बॉलर्समध्ये 7 स्पिन बॉर्सचा समावेश आहे. पहिल्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) फास्ट बॉलर  लसिथ मलिंगा (Lasith Malinga) आहे. मलिंगानं 122 मॅचमध्ये 170 विकेट्स घेतल्या आहेत. पण, त्यानं आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मलिंगाचा आयपीएलमधील सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड यंदा तुटण्याची शक्यता आहे. कारण, दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) लेगस्पिनर अमित मिश्रानं 166 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला आता मलिंगाचा रेकॉर्ड मोडण्यासाठी आणखी 5 विकेट्सची गरज आहे. यूएईमधील पिच आणि वातावरण पाहाता मिश्रा यंदा सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड नक्की करेल असं मानलं जात आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱअया बॉलर्समध्ये तिसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा पियूष चावला (Piyush Chawla) आहे. त्यानं 164 मॅचमध्ये 156 विकेट्स घेतल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्सच्या ड्वेन ब्राव्होच्या नावावरही इतक्याच विकेट्स आहेत. त्यानंतर हरभजन सिंग (150 विकेट्स), रविचंद्रन अश्विन (139 विकेट्स), सुनील नरीन (130 विकेट्स) आणि युजवेंद्र चहल (125 विकेट्स) यांचा समावेश आहे. T20 World Cup 2021: अश्विनच्या समावेशाबाबत गावसकरांचा धक्कादायक दावा, म्हणाले... आयपीएल स्पर्धेचा पहिला टप्पा बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानं रद्द करण्यात आला होता. आता उर्वरित 31 सामन्यांचा दुसरा टप्पा यूएईमध्ये होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) यांच्या लढतीनं हा टप्पा सुरू होणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published: