Home /News /sport /

'मी तिचा मालक नाही...', पत्नीच्या फोटोवरून ट्रोल करणाऱ्यांना इरफान पठाणने सुनावलं

'मी तिचा मालक नाही...', पत्नीच्या फोटोवरून ट्रोल करणाऱ्यांना इरफान पठाणने सुनावलं

टीम इंडियाचा (Team India) माजी ऑल राऊंडर इरफान पठाण हा पत्नी सफा बेगच्या फोटोमुळे (Irfan Pathan Wife Blur Photo) चर्चेत आला आहे.

    मुंबई, 26 मे: टीम इंडियाचा (Team India) माजी ऑल राऊंडर इरफान पठाण हा पत्नी सफा बेगच्या फोटोमुळे (Irfan Pathan Wife Blur Photo) चर्चेत आला आहे. इराफानच्या पत्नीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे. यामध्ये तिचा चेहरा ब्लर (लपवण्यात) आला आहे. यावर काही जणांनी इरफानला प्रश्न विचारला आहे. इराफनला काही युझर्सनी पत्नीला बरोबरीची वागणूक देण्याचा सल्ला दिला. हा वाद वाढत चालल्याचं लक्षात येताच इराफानला सोशल मीडियावर याचे उत्तर देणे भाग पडले. इराफनने तो फोटो ट्विट करत म्हंटले आहे की, ' हा फोटो माझ्या रानीने (पत्नी) मुलाच्या अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे. या फोटोवरुन आम्हाला अनेकांचा द्वेष सहन करावा लागत आहे. माझ्या पत्नीने तिच्या मर्जीने स्वत:चा चेहरा ब्लर केला आहे. मी तिचा मालक नाही तर जोडीदार आहे.' इरफान पठाण अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या पत्नीसोबतचा फोटो शेअर करतो. त्यामध्ये तिचा चेहरा नेहमी झाकलेला असतो. इरफान नुकताच पत्नीसोबत रशियाला गेला होतो. तेथील प्रत्येक फोटोमध्येही पत्नीचा चेहरा लपवण्यात आला होता. इरफानने 2016 साली सफा बेगशी लग्न रेले आहे. सफा लग्नाच्या पूर्वी जेद्दामध्ये मॉडेलिंग करत होती. इरफानशी लग्न झाल्यानंतर तिने मॉडेलिंग सोडले. त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव इमरान पठाण आहे. VIDEO: विराट कोहलीची फुटबॉल किक Social Media वर हिट, फुटबॉलपटूने मागितली शिकवण्याची फिस कोरोना संकटामध्ये इरफान पठाणने त्याचा भाऊ युसूफ पठाणसह (Yusuf Pathan) पुढाकार घेतला आहे.  पठाण बंधूंची ऍकेडमी दक्षिण दिल्लीमधल्या कोरोना प्रभावित लोकांना मोफत जेवण देण्याची घोषणा केली होती. पठाण बंधूंचे वडील मेहमूद खान यांनीही त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून बडोद्यात गरजूंना मोफत अन्न वाटप केलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Viral photo

    पुढील बातम्या