IPL 2021 : आयपीएल लिलावातील सर्वात महागड्या खेळाडूचा दुसऱ्याच दिवशी जबरदस्त खेळ

आयपीएल लिलावातील (IPL Auction 2021) सर्वात महागडा खेळाडू असलेल्या ख्रिस मॉरीसनं (Chris Morris) दक्षिण आफ्रिकेतील देशांतर्गत टी-20 स्पर्धेत जबरदस्त खेळ केला आहे.

आयपीएल लिलावातील (IPL Auction 2021) सर्वात महागडा खेळाडू असलेल्या ख्रिस मॉरीसनं (Chris Morris) दक्षिण आफ्रिकेतील देशांतर्गत टी-20 स्पर्धेत जबरदस्त खेळ केला आहे.

  • Share this:
    मुंबई, 20 फेब्रुवारी : आयपीएल लिलावातील (IPL Auction 2021) सर्वात महागडा खेळाडू असलेल्या ख्रिस मॉरीसनं (Chris Morris) दक्षिण अफ्रिकेतील देशांतर्गत टी-20 स्पर्धेत जबरदस्त खेळ केला आहे. मॉरीसनं टायटन्सकडून खेळताना फक्त 10 रन देऊन 1 विकेट घेतली. तसंच 8 बॉलमध्ये नाबाद 21 रन काढले. मॉरीसच्या या ऑलराऊंड खेळामुळे टायटन्सनं नाईटचा 6 विकेट्सनं पराभव केला. नाईट्सची टीम पहिल्यांदा बॅटिंग करताना 16.2 ओव्हरमध्ये 116 रन काढून आऊट झाली. टायटन्सनं या टार्गेटचा पाठलाग 17.1 ओव्हरमध्ये चार विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केला. मॉरीस शिवाय कॅप्टन हेन्रिक क्लासेननं नाबाद 54 रन काढले. आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू मॉरीसला राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) 16 कोटी 25 लाख रुपयांना खरेदी केलं आहे. आयपीएल लिलावाच्या आजवरच्या इतिहासात कोणत्याही खेळाडूला मिळालेली ही सर्वात जास्त रक्कम आहे. मॉरीसला खरेदी करण्यासाठी मुंबई इंडियन्स (MI) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) पंजाब किंग्स (PKBS) यांच्यात जोरदार चुरस रंगली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं आपल्या जुन्या खेळाडूला खरेदी करण्याचा जोरदार प्रयत्न केला. तर मुंबईला ट्रेंट बोल्टचा साथीदार म्हणून मॉरीस हवा होता. या दोन्ही टीमनं माघार घेतल्यानंतर पंजाब आणि राजस्थानमध्ये जोरदार चुरस रंगली. त्यामध्ये अखेर राजस्थान रॉयल्सनं बाजी मारली. आता मॉरीस राजस्थानच्या टीममध्ये आल्यानं जोफ्रा आर्चरचा बॉलिंगवरील ताण कमी होईल अशी आशा राजस्थानच्या फॅन्सना आहे. ( वाचा : 19 फोर, 11 सिक्स! मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूचा टीम इंडियातील जागेसाठी दावा ) ख्रिस मॉरीस हा आयपीएलच्या लिलावात नेहमीच महागडा खेळाडू ठरला आहे. मॉरीसला सर्वात प्रथम 2013 साली चेन्नई सुपर किंग्सनं खरेदी केलं होतं. त्यावेळी चेन्नईनं मॉरीसला त्याच्या बेस प्राईजपेक्षा 31 पट जास्त रकमेनं खरेदी केलं होतं. त्यानंतर 2016 साली त्याला राजस्थान रॉयल्सनं खरेदी केलं होतं. राजस्थानहून दिल्ली आणि बंगळुरु असा प्रवास करुन तो पुन्हा एकदा राजस्थानच्या टीममध्ये दाखल झाला आहे.
    Published by:News18 Desk
    First published: