• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 19 फोर, 11 सिक्स! मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूचा टीम इंडियातील जागेसाठी दावा

19 फोर, 11 सिक्स! मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूचा टीम इंडियातील जागेसाठी दावा

गेल्या अनेक दिवसापासून भारताच्या राष्ट्रीय टीमचं (Team India) दार ठोठावत असलेल्या इशान किशननं (Ishan Kishan) आणखी एक आक्रमक खेळी केली आहे.

 • Share this:
  इंदूर, 20 फेब्रुवारी : गेल्या अनेक दिवसापासून भारताच्या राष्ट्रीय टीमचं (Team India) दार ठोठावत असलेल्या इशान किशननं (Ishan Kishan) आणखी एक आक्रमक खेळी केली आहे. विजय हजारे ट्रॉफीला (Vijay Hazare Trophy) शनिवारपासून सुरुवात झाली. या स्पर्धेचा पहिला दिवस इशाननं गाजवला. मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) या धडाकेबाज विकेटकिपर-बॅटसमननं फक्त 94 बॉलमध्ये 19 फोर आणि 11 सिक्सच्या मदतीनं 173 रन केले. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मर्यादीत ओव्हर्सच्या टीमची घोषणा अजून बाकी आहे. या निवडीपूर्वीच इशाननं ही खेळी करत निवड समितीसमोर दावेदारी सादर केली आहे. विजय हजारे ट्रॉफीतल्या एलिट गटातील B ग्रुपमधील झारखंड (Jharkhand) विरुद्ध मध्य प्रदेश (Madhya Pradesh) यांच्यातील एकदिवसीय सामना इंदूरमध्ये (Indore) होत आहे. या सामन्यात यजमान मध्य प्रदेशचा कॅप्टन पार्थ सहानीनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला.

  (वाचा - IND vs ENG : टीम इंडियाच्या फास्ट बॉलरची होणार फिटनेस टेस्ट!)

  झारखंडचा कॅप्टन असलेला इशान ओपनिंगला आला होता. झारखंडची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी पहिली विकेट 10 रनवरच गमावली. त्यानंतर इशाननं कुमार कुशाग्रसोबत दुसऱ्या विकेटसाठी 113 रनची भागीदारी केली. यामध्ये बहुतेक रन इशाननंच काढले. त्यानंतर विराट सिंगसोबत इशानची जोडी जमली. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 117 रनची भागिदारी केली. इशान आऊट झाला त्यावेळी त्यानं फक्त 94 बॉलमध्ये 173 रनची खेळी केली.

  (वाचा - IPL 2021 : धोनीने पुन्हा उभारली म्हाताऱ्यांची फौज, ही आहे सगळ्यात तरुण टीम)

  झारखंडचा विशाल स्कोअर इशान आऊट झाल्यानंतरही झारखंडची गती कमी झाली नाही. त्यांनी 50 ओव्हरमध्ये 9 आऊट 422 रन केले. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडूनच खेळणाऱ्या अनुकूल रॉयनं (Anukul Roy) शेवटच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी केली. त्यानं फक्त 39 बॉलमध्ये  3 फोर आणि 7 सिक्सच्या मदतीनं 72  रन केले. त्याच्या फटकेबाजीमुळे झारखंडनं मध्यप्रदेशसमोर 423 रनचं आव्हान ठेवलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: