जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA 2ndT20 : कटकहून आली काळजीची बातमी, मॅचपूर्वीच वाढलं दोन्ही टीमचं टेन्शन

IND vs SA 2ndT20 : कटकहून आली काळजीची बातमी, मॅचपूर्वीच वाढलं दोन्ही टीमचं टेन्शन

IND vs SA 2ndT20 : कटकहून आली काळजीची बातमी, मॅचपूर्वीच वाढलं दोन्ही टीमचं टेन्शन

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसरा टी20 सामना आज (रविवार) कटकच्या बाराबती स्टेडिअममध्ये होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 जून : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसरा टी20 सामना आज (रविवार) कटकच्या बाराबती स्टेडिअममध्ये होणार आहे. पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढत मालिकेत बरोबरी करण्याच्या उद्देशानं टीम इंडियात या सामन्यात उतरणार आहे. तर मालिकेतील आघाडी 2-0 अशी वाढवण्याचा दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न असेल. मालिकेतील महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यापूर्वी दोन्ही टीमचं टेन्शन वाढलंय. हवामान विभागानं या सामन्याच्या दरम्यान पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. कटकमध्ये रविवारी संध्याकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. त्यामुळे सामन्याच्या दरम्यान पावसाचा अडथळा येऊ शकतो. तसं झालं तर दोन्ही टीमसह फॅन्सच्या आनंदावर विरजण पडेल. भुवनेश्वरच्या हवामान विभागाचे संचालक एच. आर. विश्वास यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, ‘टी20 सामन्याच्या दरम्यान पावसाची शक्यता 50 टक्के आहे. मॅचच्या दरम्यान वातावरण ढगाळ असेल रविवारी संध्याकाळी काही वेळ पाऊस पडू शकतो. पाऊस पडणार की नाही याचा नेमका अंदाज 3 ते 4 तास आधीच लावता येईल.’ या सामन्याच्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे. IND vs SA : क्रिकेट मॅचच्या दरम्यान स्टेडिअममध्येच भिडले फॅन्स, लाथाबुक्यांनी केली मारहाण! VIDEO दरम्यान, मॅचच्या दरम्यान पावसाच्या सर्व प्रकारच्या अ़डथळ्यासाठी सज्ज असल्याचा दावा ओडिशा क्रिकेट असोसिएशननं केला आहे. ‘BCCI च्या तांत्रिक टीमच्या सल्ल्यानुसार आम्ही ड्रेनेज यंत्रणा तयार केली आहे. संपूर्ण मैदानाला झाकण्यासाठी इंग्लंडहून कव्हर खरेदी केले आहेत. तर ऑस्ट्रेलियातून सुपर सॉपर खरेदी केलंय. दिवसभर पाऊस झाला तरी त्यामधूनही मार्ग काढता येऊ शकेल, अशी आमची तयारी आहे,’ असा दावा या अधिकाऱ्यानं केलाय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात