मुंबई, 3 नोव्हेंबर : क्रिकेट विश्वाचं संपूर्ण लक्ष सध्या ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कप वर आहे. त्याचवेळी भारतामध्ये आगामी आयपीएल सिझनची तयारी सुरू झाली आहे. आजवर आयपीएल स्पर्धा एकदाही न जिंकलेल्या पंजाब किंग्जनं आगामी सिझनसाठी मोठा बदल केलाय. पंजाबनं टीमच्या कॅप्टन पदावरुन मयांक अग्रवालची हकालपट्टी केलीय. मयांकच्या जागी आता शिखर टीमचा कॅप्टन असेल. बुधवारी पंजाब किंग्जच्या फ्रँचायझी बोर्डच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला का झाला बदल? मयंक अग्रवाल पंजाब किंग्जचा कॅप्टन असताना मागील सिझनमध्ये टीमला IPL प्लेऑफपर्यंत पोहोचवण्यात अपयश आलं होतं. त्यामुळे त्याच्या पदावर आधीच टांगती तलवार होती. केएल राहुल लखनऊ सुपरजाइंट्स टीमसोबत जोडला गेल्यानंतर मयंकला IPL 2022 च्या सिझनसाठी कॅप्टन म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्याच्या नेतृत्वात टीमची कामगिरी खालावली. स्वत: मयंक 16.33 च्या सरासरीने 196 रन करू शकला. मागील वर्षीच धवनला कॅप्टन करण्याच्या दृष्टीनं फ्रँचायजीचा विचार होता. पण ऐनवेळी मयंकला कॅप्टन करण्यात आले. आयपीएलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखर धवनला प्लेअर आणि कॅप्टन म्हणून आयपीएलमध्ये चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्याच्याकडे नेतृत्व देण्यासंदर्भात निर्णय झाला. शिवाय पहिल्या सिझनमध्ये टीमसाठी शिखरने चांगली कामगिरी केल्याने त्याची निवड झाली. बूट साफ करण्यासाठी ब्रश घेऊन मैदानात चारही बाजूंना होता धावत; रघुने क्रिकेटप्रेमींची जिंकली मनं या वर्षाच्या सुरूवातीला मेगा ऑक्शनमध्ये 8.25 कोटी रुपये देऊन शिखरला पंजाब टीममध्ये घेतले होते. 36 वर्षीय शिखरने 14 मॅचेसमध्ये 38.33 च्या सरासरीने आणि 122.66 च्या स्ट्राइक रेटने 460 रन केले आहेत. जरी शिखरला नेतृत्वाची जबाबदारी दिली गेली असली तरी फ्रँचायजी मयंकला टीममध्ये कायम ठेवण्यास इच्छुक आहे. प्लेअर्सना 15 नोव्हेंबरपर्यंत टीममध्ये घेण्याबाबत ठरवावे लागणार असल्याने यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. टीम इंडिया जिंकली, पण सेमी फायनलचं तिकीट मिळालं का? पाहा पॉईंट टेबल काय सांगतं? आयपीएलमध्ये शिखर धवन सातत्यानं उत्तम कामगिरी करत आहे. परंतु, तो टीम इंडियासाठी फक्त 50 ओव्हरच्या फॉर्मेटमध्ये खेळतो. नुकत्याच झालेल्या वन-डे सीरिजमध्ये धवन भारतीय टीमचा कॅप्टन होता. तसंच या महिन्याच्या शेवटी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सीरिजमध्ये तो भारतीय टीमचं नेतृत्व करणार आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा कॅप्टन म्हणूनही शिखरकडे चांगला अनुभव आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.