मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /12 सिझन 5 ट्रॉफी नंतर पोलार्डची इमोशनल एक्झिट, पण मुंबईसोबतच करणार हे काम!

12 सिझन 5 ट्रॉफी नंतर पोलार्डची इमोशनल एक्झिट, पण मुंबईसोबतच करणार हे काम!

IPL 2023 : मुंबईचा स्टार ऑलराऊंडर कायरन पोलार्डनं आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. पण, त्याचं मुंबईसोबतचं नातं कायम असेल.

IPL 2023 : मुंबईचा स्टार ऑलराऊंडर कायरन पोलार्डनं आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. पण, त्याचं मुंबईसोबतचं नातं कायम असेल.

IPL 2023 : मुंबईचा स्टार ऑलराऊंडर कायरन पोलार्डनं आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. पण, त्याचं मुंबईसोबतचं नातं कायम असेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 15 नोव्हेंबर :  आयपीएल 2023 चे पडघम वाजू लागले आहेत. या सिझनसाठी खेळाडू रिटेन करण्याची यादी सादर करण्यासाठी आता काही तासच उरले आहेत. त्यापूर्वी मुंबई इंडियन्समधून एक मोठी बातमी आली आहे. मुंबईचा स्टार ऑलराऊंडर कायरन पोलार्डनं आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. पोलार्ड तब्बल 12 आयपीएल सिझन मुंबईकडून खेळला आहे. मुंबईनं आजवर  मिळवलेल्या पाचही विजेतेपदामध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा आहे.पोलार्ड मुंबईकडून मैदानात खेळणार नसला तरी टीमसाठी एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

मुंबईसोबत नातं कायम

मुंबई इंडियन्सचा 2010 पासून सदस्य असलेल्या पोलार्डसाठी मागील आयपीएल सिझन खराब गेला होता. त्यानंतर त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. आगामी आयपीएल सिझनमध्ये मुंबई त्याला रिटेन करणार नाही, अशी चर्चा सुरू असतानाच पोलार्डनं आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली.

पोलार्ड आयपीएल खेळणार नसला तरी त्यानं मुंबईसोबत नातं सोडलेलं नाही. तो आगामी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा बॅटींग कोच असेल. आयपीएलचा भक्कम अनुभव असलेल्या पोलार्डकडं जगभरातील टी20 लीगमध्ये खेळून जमा झालेली शिदोरी आहे. या सर्व अनुभवाच्या जोरावर तो मुंबईच्या नव्या खेळाडूंना बॅटींगचे धडे देणार आहे. पोलार्डनं एक इमोशनल पोस्ट लिहून त्याच्या आयपीएलमधील निवृत्तीची आणि नव्या भूमिकेची घोषणा केली.

दमदार पोलार्ड

कायरन पोलार्डनं 2010 ते 2022 पर्यंत 189 आयपीएल सामने खेळले.यामध्ये त्यानं 147.32 च्या स्ट्राईक रेटनं 3412 रन केले. यात 16 हाफ सेंच्युरींचा समावेश असून 87 हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे.

IPL च्या मिनी ऑक्शनपूर्वी KKR ला मोठा धक्का; सर्वांत महागड्या बॉलरनं सिझनमधून घेतली माघार

ऑलराऊंडर पोलार्डनं या कालावधीमध्ये 8.79 च्या इकोनॉमी रेटनं 69 विकेट्स घेतल्या. 44 रन देऊन 4 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. मागील काही सिझनमध्ये मुंबईचा नियमित कॅप्टन रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये टीमचं नेतृत्त्वही पोलार्डनं सांभाळलं होतं.

First published:

Tags: Ipl, Kieron pollard, Mumbai Indians