मुंबई, 5 मे : चार वेळा आयपीएल स्पर्धा जिंकलेल्या चेन्नई सुपर किंग्सचं (CSK) आयपीएल 2022 मधील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. सीएसकेला आत्तापर्यंत 10 पैकी फक्त 3 सामने जिंकता आले आहेत. या सिझनमधील सीएसकेच्या खराब कामगिरीचं कारण कॅप्टनसीमध्ये झालेला बदल आहे. महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) सिझन सुरू होण्याच्या दोन दिवस आधी रविंद्र जडेजाकडं (Ravindra Jadeja) कॅप्टनसी सोपवली होती. सततच्या पराभवानंतर पुन्हा धोनी कॅप्टन झाला. आता याला बराच उशीर झाला असून सीएसके स्पर्धेच्या बाहेर जाणार हे स्पष्ट झालं आहे. रोखठोक मतांसाठी प्रसिद्ध असलेला टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं (Virendra Sehwag) सीएसके मॅनेजमेंटच्या कॅप्टन बदलण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. ‘क्रिकबझ’शी बोलताना सेहवाग म्हणाला की, ‘त्यांनी पहिली चूक सिझनच्या सुरूवातीलाच केली. महेंद्रसिंह धोनीच्या जागी जडेजाला कॅप्टन म्हणून नियुक्त केले. हा चुकीचा निर्णय होता. प्लेईंग 11 निश्चित नव्हती. ऋतुराज गायकवाडनं सुरूवातीला रन केले नाहीत. त्यानं खराब सुरूवात केली. अन्य बॅटरनंही रन केले नाहीत. त्यामुळे आणखी गोष्टी बिघडल्या. धोनी सुरूवातीपासूनच कॅप्टन असता तर सीएसकेचा कदाचित इतक्या सामन्यात पराभव झाला नसता.’ रविंद्र जडेजासाठी फक्त कॅप्टन म्हणून नाही तर खेळाडू म्हणूनही हा सिझन खराब गेला आहे. जडेजाच्या कॅप्टनसीमध्ये सीएसकेनं 8 पैकी फक्त 2 सामने जिंकले. त्यानं आत्तापर्यंत 10 मॅचमध्ये 19.33 च्या सरासरीनं फक्त 116 रन केले असून अवघ्या 5 विकेट्स घेतल्या आहेत. IPL 2022 : RCB च्या विजयाचा हिरो कामगिरीवर समाधानी नाही, स्वत:च सांगितलं कारण या स्पर्धेतील सीएसकेच्या कामगिरीवर हेड कोच स्टिफन फ्लेमिंग (Stephen Fleming) नाराजी व्यक्त केली आहे. टीमनं तीन्ही विभागात खराब कामगिरी केल्याचं फ्लेमिंगनं सुनावलं. ‘आम्ही सर्वच विभागात खराब खेळ केला. आमची फिल्डिंग चांगली झाली नाही. आम्ही कॅच सोडले ही काळजीची बाब आहे. अनेक मॅचमध्ये आम्ही विजयाच्या जवळ होतो. त्यानंतरही आमच्या हातातून सामने निसटले. आम्ही निर्णायक विजय मिळवू शकलो नाही. टीमचा फॉर्म खराब असेल तरच या गोष्टी घडतात. आम्ही तीन्ही विभागात आमच्या क्षमतेपेक्षा खराब खेळ केला.’ असं फ्लेमिंगनं मान्य केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.