जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराटचे गावसकरांनी टोचले कान, म्हणाले....

IPL 2022 : खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराटचे गावसकरांनी टोचले कान, म्हणाले....

IPL 2022 : खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराटचे गावसकरांनी टोचले कान, म्हणाले....

टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट आयपीएल 2022 मध्ये शांत आहे. विराट रविवारी झालेल्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवर आऊट झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 मे : टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट आयपीएल 2022 मध्ये शांत आहे. विराट रविवारी झालेल्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवर आऊट झाला. या सिझनमध्ये तिसऱ्यांदा विराट ‘गोल्डन डक’ चा बळी ठरला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा त्याला विश्रांती देण्याच्या मागणीनं जोर धरलाय. टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी या विषयावर मत व्यक्त केले असून त्यांनी विराटला गंभीर इशारा दिला आहे. विराटनं या आयपीएलमधील 12 मॅचमध्ये 111 च्या स्ट्राईक रेटनं 216 रन केले आहेत. त्यानं या सिझनमध्ये फक्त एक अर्धशतक झळकावलं आहे. सहा सामन्यांमध्ये तो एक अंकी धावसंख्येवर आऊट झालाय. आजवरच्या आयपीएलमधील त्याची ही सर्वात खराब कामगिरी आहे. त्यामुळे त्याला ब्रेक देण्याची मागणी करण्यात येत आहे. टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे. गावसकर यांनी ‘स्टार स्पोर्ट्स’ वरील कार्यक्रमाता सांगितले की, ‘ब्रेकचा अर्थ असा नाही की तो (विराट) भारताच्या मॅच खेळणार नाही. भारताकडून खेळणं ही त्याची पहिली आणि सर्वोच्च प्राथमिकता पाहिजे. हे अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. माझ्या मते तो खेळलाच नाही तर त्याचा हरवलेला फॉर्म परत कसा येईल. ड्रेसिंग रूममध्ये बसून फॉर्म परत येणार नाही. तो जितका जास्त खेळेल तितकी तो जुन्या फॉर्ममध्ये परतण्याची शक्यता जास्त आहे.’ IPL 2022, MI vs KKR Dream 11 Team Prediction: ‘या’ खेळाडूंचा करा तुमच्या टीममध्ये समावेश ‘संपूर्ण देशाची इच्छा’ गावसकर पुढे म्हणाले की, ‘तुम्ही संपूर्ण देशभर विचारा. क्रिकेट ज्याला समजतं तसंच जो हा खेळ फॉलो करतो तो प्रत्येक जण आम्हाला भारतीय टीमसाठी विराट कोहली फॉर्मात यायला हवा, असंच सांगेल. तुम्ही टीम इंडियाकडून खेळण्यापासून ब्रेक घेऊ शकत नाही. विराटनं भारताकडून रन बनवावेत अशीच सर्वांची इच्छा आहे. आम्हाला सर्वांना त्यानं पुन्हा एकदा मोठा स्कोर केलेला पाहायचा आहे.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात