Home /News /sport /

VIDEO : शिखर धवनला वडिलांनी बदडले, पंजाब Playoff मध्ये न गेल्यानं काढला राग!

VIDEO : शिखर धवनला वडिलांनी बदडले, पंजाब Playoff मध्ये न गेल्यानं काढला राग!

पंजाब किंग्जचा ओपनर शिखर धवननं (Shikhar Dhawan) एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये धवनला त्याचे वडील मारहाण करताना दिसत आहेत.

  मुंबई, 26 मे : पंजाब किंग्जला (Punjab Kings) या आयपीएल स्पर्धेची 'प्ले ऑफ' गाठण्यात अपयश आले. पंजाबच्या टीमनं काही चमकदार विजय मिळवत शेवटच्या आठवड्यापर्यंत आव्हान कायम ठेवलं होतं. पण, त्यांना निर्णायक क्षणी खेळ उंचावता आला नाही. पंजाबकडून यंदा पहिल्यांदाच आयपीएल सिझन खेळणाऱ्या शिखर धवननं (Shikhar Dhawan) संपूर्ण सिझनमध्ये 460 रन केले. धवनचे हे प्रयत्न त्यांना 'प्ले ऑफ' मध्ये नेण्यास पुरेसे ठरले नाहीत. पंजाब किंग्जचे आव्हान संपल्यानंतर शिखर धवननं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये धवनला त्याचे वडील मारहाण करताना दिसत आहेत. पंजाब 'प्ले ऑफ' मध्ये न गेल्यानं वडिलांनी मारहाण केली, असं कॅप्शन धवननं या व्हिडीओला दिलं आहे. हा व्हिडीओ आणि कॅप्शन पाहून तुम्हाला धक्का बसला असेल तर घाबरू नका. शिखर धवनचा हा व्हिडीओ कॉमेडी आहे. धवन नेहमीच सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतो. त्याच पद्धतीनं त्यानं हा मनोरंजनासाठी हा व्हिडीओ शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला फॅन्ससी चांगलीच पसंती दिली असून त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
   द्रविडनं केला धवनला फोन आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतरही शिखर धवनची दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या टी 20 टीममध्ये निवड करण्यात आलेली नाही.  त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं, आहे. या मालिकेसाठी टीमची निवड व्हायच्या आधी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) स्वत: शिखर धवनला फोन केला आणि तुझी टीममध्ये निवड होत नसल्याचं सांगितलं. IPL 2022 : विराट कोहलीची बॅटींग पाहून बदलला गांगुलीचा चेहरा, पाहा VIDEO टी-20 मध्ये युवा खेळाडूंना संधी दिली गेली पाहिजे. राहुलला हा कठीण निर्णय घ्यायचा होता आणि सगळे त्याच्याशी सहमत होते. टीम निवडीच्या आधी द्रविडने शिखर धवनला फोन केला आणि ही माहिती दिली,' अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं दिली आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Ipl 2022, Punjab kings, Shikhar dhawan, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या