मुंबई, 1 डिसेंबर: आयपीएल 2022 (IPL 2022) साठी रिटेन झालेल्या खेळाडूंची नावं जाहीर झाली आहेत. चेन्नई सुपर किंग्सनं 4 खेळाडूंना रिटेन केले आहे. यामध्ये महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja), मोईन अली (Moeen Ali) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांचा समावेश आहे. चेन्नईच्या यादीमधील विशेष बाब म्हणजे रविंद्र जडेजाला कॅप्टन धोनीपेक्षा अधिक रक्कम देऊन रिटेन करण्यात आलेले आहे. IPL 2022 साठी Retention सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्सने रवींद्र जडेजाला तब्बल 16 कोटींची बोली लावली. तर महेंद्र सिंह धोनीला 12 कोटी आणि मोईन अलीला 8 कोटी रुपये लावून रिटेन करण्यात आले आहे. मागील आयपीएलमध्ये धडाकेबाज खेळी करणार्या ऋतुराज गायकवाडला सुद्धा 6 कोटी तर इंग्लंडचा ऑल राऊंडर मोईन अलीला 8 कोटींमध्ये रिटेन करण्यात आले करण्यात आले आहे.
The SU4ER KINGS 💛#YelloveAgain #WhistlePodu 🦁 pic.twitter.com/esmttRf48c
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 30, 2021
चेन्नई सुपर किंग्सनं धोनीच्या नेतृत्त्वाखाली 4 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. यामध्ये आयपीएल 2021 (IPL 2021) सिझनमधील विजेतेपदाचाही समावेश आहे. त्यानंतरही महेंद्रसिंह धोनीला फक्त जडेजाच नाही तर 5 खेळाडूंपेक्षा कमी रक्कम मिळाली आहे. राजस्थान रॉयल्सनं संजू सॅमसनला (Sanju Samson) 14 कोटींमध्ये रिटेन केले आहे. सनरायझर्स हैदराबादनं (SRH) त्यांचा कॅप्टन केन विल्यमसनला (Kane Williamson) कायम ठेवण्यासाठी 14 कोटी मोजले आहेत. दिल्ली कॅपिटल्सनं (DC) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या दोन टीमनी अनुक्रमे ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना प्रत्येकी 16 कोटी दिले आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (RCB) विराट कोहलीला (Virat Kohli) 15 कोटींची रक्कम देऊन रिटेन केले आहे. IPL Retention 2022 : Delhi Capitals ने सोडली ‘कॅप्टन’ची साथ, तीन पैकी दोन मुंबईकरांना डच्चू आयपीएल 2022 मध्ये एकूण 10 टीम सहभागी होणार आहेत. 8 टीमचे रिटेन्शन पूर्ण झाल्यानंतर लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या टीम 3-3 खेळाडूंना ड्राफ्टच्या माध्यमातून करारबद्ध करणार आहेत. पंजाब किंग्जचा कॅप्टन केएल राहुलला (KL Rahul) लखनऊची टीम 20 कोटी देणार असल्याची चर्चा आहे. तसं झालं तर राहुल आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरणार आहे.

)







