Home /News /sport /

IPL 2022 : विमानतळावरून थेट मैदानात पोहचला पंजाबचा खेळाडू, 56 बॉलमध्ये केलं शतक

IPL 2022 : विमानतळावरून थेट मैदानात पोहचला पंजाबचा खेळाडू, 56 बॉलमध्ये केलं शतक

पंजाब किंग्जमधील (Punjab Kings) खेळाडू आयपीएल स्पर्धेतून सोमवारी सकाळी मायदेशी परतला. त्यावेळी तो विमानतळावरून थेट सामना खेळण्यासाठी गेला आणि त्यानं शतक झळकावलं.

    मुंबई, 23 मे : आयपीएल 2022 मधील आता फक्त 'प्ले ऑफ' चे 4 सामने उरले आहेत. स्पर्धेतील 10 पैकी 6 टीमचं आव्हान संपुष्टात आलंय. पंजाब किंग्जचं (Punjab Kings) आयपीएल 'प्ले ऑफ' गाठण्याचं स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहिलं. पंजाबनं 14 सामन्यानंतर 7 विजय आणि 7 पराभवासह सहावा क्रमांक पटकावला. रविवारी झालेल्या लीग स्टेजमधील शेवटच्या लढतीमध्ये पंजाबनं सनरायझर्स हैदराबादचा 5 विकेट्सनं पराभव करत स्पर्धेचा शेवट गोड केला. पंजाब किंग्जमधील भानुका राजपक्षे (Bhanuka Rajapaksa) सोमवारी सकाळी मायदेशी परतला. श्रीलंकेत परतल्यानंतर तो विमानतळावरून थेट क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात गेला. भानुकानं विमानतळावरून इंटर क्लब सामना खेळायला गेला होता. या सामन्यात त्यानं फक्त 56 बॉलमध्ये शतक झळकावलं. या खेळीत त्यानं 9 सिक्स आणि 4 फोर लगावले. भानुकानं या सिझनमध्ये आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले. त्यानं 9 सामन्यात 22.09 च्या सरासरीनं 206 रन केले. त्याचा स्ट्राईक रेट 160 च्या आसपास होता. पण, त्याला एकही अर्धशतक झळकावण्यात अपयश आले. 43 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध रविवारी झालेल्या पंजाबच्या शेवटच्या सामन्यात भानुकाला वगळण्यात आले होते. या सामन्यात हैदराबादने दिलेलं 158 रनचं आव्हान पंजाबने 15.1 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून पार केलं. लियाम लिव्हिंगस्टोनने (Liam Livingstone) 22 बॉलमध्ये नाबाद 49 रन केले, यात 5 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. याशिवाय शिखर धवनने (Shikhar Dhawan) 39 आणि बेयरस्टोने 23 रनची खेळी केली.  हैदराबादकडून फजलहक फारुकीला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या, याशिवाय वॉशिंग्टन सुंदर, जगदीशा सुचित आणि उमरान मलिक यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. IPL 2022 मधील चांगल्या कामगिरीनंतरही 7 जणांकडं निवड समितीचं दुर्लक्ष आयपीएल प्ले-ऑफच्या टीम आधीच ठरल्यामुळे या सामन्याला फारसं महत्त्व नव्हतं. गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जाएंट्स आणि आरसीबी या चार टीम प्ले-ऑफमध्ये खेळणार आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ipl 2022, Punjab kings

    पुढील बातम्या