जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : SRH ची पॉईंट टेबलमध्ये मोठी उडी, नामुश्कीदायक पराभवानंतर RCB अडचणीत

IPL 2022 : SRH ची पॉईंट टेबलमध्ये मोठी उडी, नामुश्कीदायक पराभवानंतर RCB अडचणीत

IPL 2022 : SRH ची पॉईंट टेबलमध्ये मोठी उडी, नामुश्कीदायक पराभवानंतर RCB अडचणीत

सनराझर्स हैदराबादनं रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore) 9 विकेट्सनं मोठा पराभव केला. या विजयानंतर हैदराबादनं पॉईंट टेबलमध्ये मोठी उडी मारली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) दबदबा कायम आहे. शनिवारी झालेल्या मॅचमध्ये गुजरातनं कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) 8 रननं पराभव केला. या विजयासह गुजरातनं पॉईंट टेबलमध्ये पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला आहे.  तर त्यानंतर झालेल्या शनिवारच्या दुसऱ्या सामन्यांत सनराझर्स हैदराबादनं रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore) 9 विकेट्सनं मोठा विजय मिळवला आहे. या विजयानंतर हैदराबादनं पॉईंट टेबलमध्ये मोठी उडी मारली आहे. आयपीएलच्या या मोसमातला हैदराबादचा हा लागोपाठ पाचवा विजय आहे, पहिल्या 2 मॅच गमावल्यानंतर हैदराबादने या हंगामात अजून एकही मॅच गमावलेली नाही. पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबाद दुसऱ्या क्रमांकावर गेली आहे. तर आरसीबी चौथ्या क्रमांकावर आहे. आरसीबीने 8 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. आरसीबी आता चौथ्या क्रमांकावर आहे.

हैदराबादच्या भेदक बॉलिंगपुढे आरसीबीची संपूर्ण टीम फक्त 68 रनवर ऑल आऊट झाली. हैदराबादकडून मार्को जेनसन आणि टी. नटराजन यांना प्रत्येकी 3-3 विकेट मिळाल्या, तर जगदिशा सुचितला 2 आणि भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. ऋद्धीमान साहाला धमकी देणाऱ्या पत्रकाराला होणार शिक्षा, BCCI करणार मोठी कारवाई! आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) फॉर्म हरवल्यानं टीमच्या अडचणी वाढल्या आहेत. विराट सलग दुसऱ्या मॅचमध्ये ‘गोल्डन डक ’ वर आऊट झाला. मार्को जेनसननं त्याला आऊट केलं. आधी लखनऊविरुद्धच्या सामन्यातही विराट पहिल्याच बॉलला आऊट झाला. आरसीबीकडून सुयश प्रभुदेसाई याने सर्वाधिक 15 तर ग्लेन मॅक्सवेलने 12 रन केले, याशिवाय आरसीबीच्या दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला दोन अंकी स्कोअर करता आला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ipl 2022 , RCB , SRH
  • First Published :
जाहिरात
जाहिरात