मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : चेन्नईच्या विजयातही धोनी आणि जडेजानं केल्या धक्कादायक चुका, सर्वच झाले थक्क

IPL 2022 : चेन्नईच्या विजयातही धोनी आणि जडेजानं केल्या धक्कादायक चुका, सर्वच झाले थक्क

CSK vs MI: चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा 3 विकेट्स पराभव केला.  चेन्नईनं ही मॅच जिंकली असली तरी त्यामध्ये धोनी आणि कॅप्टन जडेजानं केलेल्या धक्कादायक चुका पाहून सर्वच थक्क झाले.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 22 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा 3 विकेट्स पराभव केला. महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) या विजयाचा हिरो ठरला. त्यानं शेवटच्या 4 बॉलमध्ये 16 रन करत चेन्नईला विजय मिळवून दिला. चेन्नईनं ही मॅच जिंकली असली तरी त्यामध्ये धोनी आणि कॅप्टन रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) केलेल्या धक्कादायक चुका पाहून सर्वच थक्क झाले.

चेन्नईची बॉलिंग सुरू असताना हा प्रकार घडला. मुकेश चौधरीनं पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशान किशनला (Ishan Kishan) आऊट करत चेन्नईला जोरदार सुरूवात करून दिली  होती. त्यानंतर मिचेल स्टॅनरनं टाकलेल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये धोनी आणि जडेजानं चूक केली.

स्टॅनरच्या त्या ओव्हरमध्ये सुरूवातीला धोनीनं सूर्यकुमार यादवचं स्टम्पिंग सोडलं. ते अवघड स्टम्पिंग असलं तरी धोनीनं या प्रकारे आऊट केलेलं आहे. त्यानंतर त्याच ओव्हरमध्ये डेवाल्ड ब्रेविसनं मारलेला बॉल पकडण्यासाठी जडेजा कव्हर्सवरून पळाला होता. पण, त्याला तो कॅच घेता आला नाही. जडेजा त्या बॉलपर्यंत पोहचलाही नाही.

जडेजानं त्यानंतर 12 व्या ओव्हरमध्ये आणखी एक चूक केली. मुंबईचा नवोदीत खेळाडू ऋतिक शौकीन यानं हवेत मारलेला बॉल जडेजाला पकडता आला नाही. जडेजा त्या बॉलच्या अगदी खाली होता. टीम इंडियाचा सर्वोत्तम फिल्डर असलेल्या जडेजानं त्याच्या कारकिर्दीमधील सर्वात सोपा कॅच सोडला. एकाच मॅचमध्ये दोन कॅच सोडण्याचा जडेजाची ही कदाचित पहिलीच वेळ असावी.

IPL 2022 : मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलंय का? पाहा काय आहे पॉईंट टेबलचं समीकरण

चेन्नईची खराब फिल्डिंग फक्त जडेजा आणि धोनीपुरती मर्यादीत नव्हती. ड्वेन ब्राव्होनं पाचव्या ओव्हरमध्ये तिलक वर्माचा कॅच सोडला. वर्मानं त्याचा फायदा घेत नाबाद अर्धशतक झळकावलं. तर शिवम दुबेनं जयदेव उनाडकतचा कॅच सोडला. उनाडकतनं 9 बॉलमध्ये 19 रन करत मुंबईचा स्कोर 155 पर्यंत पोहचवला.

First published:

Tags: Crickrt, Csk, Ipl 2022, MS Dhoni, Mumbai Indians, Ravindra jadeja