मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /कायरन पोलार्डचा भारतीय क्रिकेटपटूवर पलटवार, IPL मधील टीकेला दिलं उत्तर 

कायरन पोलार्डचा भारतीय क्रिकेटपटूवर पलटवार, IPL मधील टीकेला दिलं उत्तर 

आयपीएल स्पर्धेच्या (IPL 2022) दरम्यान टीका करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूला मुंबई इंडियन्सचा ऑल राऊंडर कायरन पोलार्डनं (Kieron Pollard) उत्तर दिलं आहे.

आयपीएल स्पर्धेच्या (IPL 2022) दरम्यान टीका करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूला मुंबई इंडियन्सचा ऑल राऊंडर कायरन पोलार्डनं (Kieron Pollard) उत्तर दिलं आहे.

आयपीएल स्पर्धेच्या (IPL 2022) दरम्यान टीका करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूला मुंबई इंडियन्सचा ऑल राऊंडर कायरन पोलार्डनं (Kieron Pollard) उत्तर दिलं आहे.

मुंबई, 2 जून : वेस्ट इंडिजचा माजी कॅप्टन कायरन पोलार्डची (Kieron Pollard) आयपीएल 2022 मधील कामगिरी निराशाजनक ठरली. या खराब कामगिरीमुळे पोलार्डनं स्पर्धेच्या उत्तरार्धात टीममधील जागा गमावली. मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) कामगिरीवरही याचा परिणाम झाला. पाचवेळा स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या या टीमला आयपीएल 'प्ले ऑफ' मध्येही प्रवेश करता आला नाही. आयपीएलमधील पोलार्डच्या खराब कामगिरीवर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) यानं टीका केली होती. आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर पोलार्डनं त्याला उत्तर दिलं आहे.

पोलार्डनं एक ट्विट करून आकाश चोप्राला उत्तर दिलं. 'तुझे फॅन्स आणि फॉलोअर्स वाढत असतील. ते यापुढेही असेच वाढत रहावे', असं ट्विट पोलार्डनं केलं. या ट्विटमध्ये पोलार्डनं आकाश चोप्राला टॅगही केलं होतं. त्यानंतर काही वेळानं त्यानं हे ट्विट डिलिट केले.

पोलार्डनं या आयपीएल सिझनमध्ये 107 च्या स्ट्राईक रेटनं 144 रन केले होते. त्याला संपूर्ण सिझनमध्ये फक्त 4 विकेट्स मिळाल्या. पोलार्डच्या या खराब कामगिरीवर आकाशनं कॉमेंट्रीच्या दरम्यान अनेकदा टीका केली होती. या टीकेला पोलार्डनं या ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिलं असं मानलं जात आहे.

काय म्हणाला होता आकाश?

मुंबई इंडियन्सच्या कामगिरीबद्दल त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश म्हणाला होता की, 'मुंबईसोबत पोलार्डचा हा शेवटचा सिझन असू शकतो. माझ्या मते मुंबई इंडियन्स पोलार्डला रिलीज करेल. ते मुरूगन अश्विनला (1.6 कोटी) देखील सोडू शकते, जयदेव उनाडकतबाबत (1.3 कोटी) ते काय निर्णय घेणार हे मी सांगू शकत नाही. पण ते नक्कीच टाइमल मिल्सला (1.5 कोटी) निरोप देतील.

'तू माझं हृदय चोरलंस तर मी तुझं...', Deepak Chahar नं लग्नानंतर लिहिली इमोशनल पोस्ट

कायरन पोलार्ड रन करत नाही. त्याच्या बॉलिंगचा कदाचित मुंबई इंडियन्सला उपयोग होईल. पण, पोलार्डला फक्त बॉलिंगसाठी टीममध्ये घेतलेलं नाही. माझ्या मते पोलार्डला बाय-बाय करण्याची वेळ आली आहे.' असं आकाश चोप्रानं म्हंटलं होतं. त्यावर नाराज होऊन पोलार्डनं हे उत्तर दिलं.

First published:

Tags: Ipl 2022, Kieron pollard, Mumbai Indians