मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022: विराट कोहलीच्या RCB ला कमी पैशांमध्ये हवाय इतिहास घडवणारा कॅप्टन

IPL 2022: विराट कोहलीच्या RCB ला कमी पैशांमध्ये हवाय इतिहास घडवणारा कॅप्टन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ही आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील कायम चर्चेत असणाऱ्या टीमपैकी एक टीम आहे. पुढील सिझनमध्ये या टीमचा कॅप्टन कोण होणार हा मोठा प्रश्न आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ही आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील कायम चर्चेत असणाऱ्या टीमपैकी एक टीम आहे. पुढील सिझनमध्ये या टीमचा कॅप्टन कोण होणार हा मोठा प्रश्न आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ही आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील कायम चर्चेत असणाऱ्या टीमपैकी एक टीम आहे. पुढील सिझनमध्ये या टीमचा कॅप्टन कोण होणार हा मोठा प्रश्न आहे.

मुंबई, 26 नोव्हेंबर: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ही आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील कायम चर्चेत असणाऱ्या टीमपैकी एक टीम आहे. या टीमकडून आजवर अनेक दिग्गज खेळाडू खेळले आहेत. टीम इंडियाचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) या टीमचा कॅप्टन होता. तसंच टीम इंडियाच्या टेस्ट आणि वन-डे टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) या टीमची कॅप्टनसी अनेक वर्ष सांभाळली आहे. मात्र तरीही त्यांना आजवर एकदाही आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद पटकावता आलेले नाही.

विराट कोहली पुढील आयपीएल सिझनमध्ये (IPL 2022) आरसीबीची कॅप्टनसी करणार नाही. विराटनं यापूर्वीच तशी घोषणा केली होती. विराटनंतर एबी डिव्हिलियर्स (Ab de Villiers) हा एक पर्याय आरसीबीकडं होता. दक्षिण आफ्रिका टीमचा माजी कॅप्टन असलेल्या डिव्हिलियर्सनं काही दिवसांपूर्वीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. डिव्हिलियर्सच्या या निर्णयामुळे आरसीबीच्या योजनांना धक्का बसला आहे.

आता आरसीबीला पुढील सिझनसाठी कॅप्टन शोधावा लागणार आहे. आगामी ऑक्शनमध्ये उतरताना कॅप्टन म्हणून कोणत्या खेळाडूला निवडायचे ही रणनीती देखील आरसीबीला करावी लागेल. पण, नवा कॅप्टन खरेदी करण्यासाठी भक्कम रक्कम आरसीबीच्या पर्समध्ये नसेल. बीसीसीआयच्या नियमानुसार प्रत्येक फ्रँचायझीला सर्व खेळाडू खरेदी करण्यासाठी 90 कोटी ही कमाल रक्कम आहे. आरसीबीनं 4 खेळाडूंना ऑक्शनपूर्वी रिटेन केले तर त्यांचे 41 कोटी रुपये आधीच खर्च होतील. त्यामुळे प्रत्यक्ष ऑक्शनच्या दिवशी त्यांच्याकडं 59 कोटी रक्कम असणार आहे. या रकमेत त्यांना कॅप्टनसह टीममधील उर्वरित सर्व जागा भरायच्या असल्यानं कमी पैशांमध्ये विजेतेपद जिंकण्याचा इतिहास घडवेल असा कॅप्टन शोधावा लागणार आहे.

कोणत्या खेळाडूंना करणार रिटेन?

विराट कोहलीनं (Virat Kohli) आरसीबीची कॅप्टनसी सोडली असली तरी तो आजही टीमचा मुख्य खेळाडू आहे. विराट कोहलीनंच ही टीम उभी केली आहे. त्यामुळे रिटेन खेळाडूंची यादी तयार करताना विराटचा शब्द अंतिम असेल. मागच्या सिझनमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) आरसीबी रिटेन करणार हे जवळपास नक्की आहे. मात्र उर्वरित 2 जागांसाठी आरसीबीकडं 5 पर्याय आहेत.

IPL 2022: SRH आणि राशिद खानमध्ये पेच, विल्यमसनमुळे अडकली डील

युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, देवदत्त पडिक्कल, हर्षल पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर या 5 भारतीय खेळाडूंचे पर्याय उर्वरित 2 जागांसाठी आरसीबीकडं आहेत.

First published:

Tags: IPL 2021, RCB, Virat kohli