मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

डेव्हिड वॉर्नर आणि SRH मध्ये जुंपली, माजी कॅप्टननं डिवचल्यानंतर फ्रँचायझीनं दिलं उत्तर

डेव्हिड वॉर्नर आणि SRH मध्ये जुंपली, माजी कॅप्टननं डिवचल्यानंतर फ्रँचायझीनं दिलं उत्तर

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू  डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्यामधील मतभेद कमी होण्याची चिन्हं नाहीत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 29 डिसेंबर : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू  डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यामधील मतभेद कमी होण्याची चिन्हं नाहीत. सनरायझर्ससाठी यावर्षीचा आयपीएल सिझन (IPL 2021) निराशाजनक ठरला. ही स्पर्धा सुरू असतानाच हैदराबादनं डेव्हिड वॉर्नरची कॅप्टनपदावरून हकालपट्टी केली. तसंच त्याला प्लेईंग 11 मधूनही वगळले. हैदराबादने आगामी सिझनसाठी (IPL 2022) वॉर्नरला रिटेन केलेले नाही.

सनरायझर्स हैदराबाादच्या एका फॅननं ट्विटरवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वॉर्नर आणि त्याच्या माजी आयपीएल फ्रँचायझीमध्ये चकमक झाली. या फॅननं आगामी ऑक्शन चांगलं असेल ना? असा प्रश्न हैदराबादचे हेड कोच टॉम मुडी यांना विचारला होता. त्या ट्विटला भावा, शंका आहे, अशी प्रतिक्रिया वॉर्नरनं दिली.

डेव्हिड वॉर्नरच्या या ट्विटला सनरायझर्स हैदराबादनं उत्तर दिलं आहे. ' डेव्ही, अ‍ॅशेस सीरिज जिंकल्याबद्दल अभिनंदन. तुझा फॉर्म परत आलाय आणि तू पार्टी एन्जॉय करत आहेस, असं वाटतंय. आमच्याकडून तुला ऑक्शनसाठी शुभेच्छा.' असं ट्विट सनरायझर्स हैदराबादनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन वॉर्नरला उत्तर देताना केले आहे.

U19 आशिया कपला कोरोनाचा फटका, 32 ओव्हर्सनंतर मॅच रद्द करण्याची आली वेळ

ऑस्ट्रेलियानं मंगळवारी मेलबर्न टेस्टमध्ये इंग्लंडचा दणदणीत पराभव करत अ‍ॅशेस सीरिजमध्ये 3-0 अशी आघाडी घेतली आहे. या सीरिजमध्ये वॉर्नरनं आत्तापर्यंत 2 अर्धशतकं झळकावली आहेत. पण, आयपीएल स्पर्धेत तो फ्लॉप ठरला होता. त्याने 8 सामन्यांमध्ये फक्त 195 रन केले होते. त्यानंतर वॉर्नरची कॅप्टनपदावरुन हकालपट्टी करत केन विल्यमसनची (Kane Williamson) नियुक्ती सनरायझर्स हैदराबादनं केली होती.

First published:

Tags: David warner, Ipl 2022 auction, SRH